केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini vaishnav) यांनी शुक्रवारी मुंबईतील (mumbai) चर्चगेट येथे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील सुरक्षा आणि विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत तब्बल आठ तास बैठक घेतली.
बैठकीत काही प्रमुख निर्णय घेण्यात आले. त्यापैकी 238 वातानुकूलित लोकल ट्रेन्सची योजना राबवणे, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गांच्या स्थितीचे मूल्यांकन करणे आणि कम्युनिकेशन-आधारित ट्रेन कंट्रोल (CBTC) सह सिग्नलिंग सिस्टममध्ये सुधारणा करणे समाविष्ट आहे.
बैठकीत मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास निगम, कोकण रेल्वे, रेल्वे जमीन विकास प्राधिकरण आणि इतर रेल्वे संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते.
अश्विनी वैष्णव यांनी मुंबईची उपनगरी रेल्वे क्षमता वाढवणे तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सुरक्षा उपाय वाढवणे यासह अनेक प्रमुख मुद्द्यांवर भर दिला.
अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना MUTP-3 आणि 3A चा भाग असलेल्या तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वे दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेसाठी (mumbai local train) 238 वातानुकूलित लोकल गाड्यांची खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे आवाहन केले.
एसी लोकलची खरेदी प्रक्रिया एमआरव्हीसीने गेल्या वर्षी जुलैमध्ये पुढे ढकलली होती. आता अधिक एसी लोकल खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
हेही वाचा