मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. वृत्तानुसार, या समस्येमुळे अप फास्ट लाईनवरील लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. परिणामी अनेक प्रवाशांना उशीर झाला होता.
या घटनेमुळे हावडा - सीएसएमटी एक्स्प्रेस आणि अनेक उपनगरीय सेवांसह यूपी लोकल आणि एक्स्प्रेस आदी गाड्यांवर परिणाम झाला. सूचना मिळाल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई केली, अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सूत्रांनी सांगितले की, सकाळी 8:20च्या सुमारास समस्या सोडवण्यात आली. त्यानंतर वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली.
वरिष्ठ विभागीय ऑपरेशन मॅनेजर (कोचिंग), मुंबई विभाग, मध्य रेल्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, UP मार्गावरील सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान बांधकाम साइटवरील बांबू ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वायरवर पडला, ज्यामुळे उपनगरीय सेवा विस्कळीत झाली.
Kurla station this morning due to electrical problems at matunga-Sion#Mumbai pic.twitter.com/8svTEO1Eqa
— Sameer (@Sameerr_009) July 24, 2024
UP मार्गावरील सायन आणि माटुंगा स्थानकांदरम्यान बांधकाम स्थळावरील बांबू ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वायरवर पडला आहे, ज्यामुळे उपनगरीय सेवांमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे, असे ट्विट रेल्वेने केले होते.
#Mumbai local. Bamboo scaffolding falls on live overhead wires between Sion-Matunga on CR. Morning rush hour trains had been stalled, restored at 820am. pic.twitter.com/3s8tIVCTa2
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) July 24, 2024
ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी आपला जीव धोक्यात घालून सीएसएमटीच्या दिशेने रुळांवरून चालत असल्याचे दिसत आहे. कारण ट्रेनची वाहतूक बराच वेळ थांबली होती. बऱ्याच प्रवाशांनी ट्विटरवर अपडेट शेअर केले तर काहींनी M-इंडिकेटर ॲपच्या चॅट विभागात माहिती प्रसारित केली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मध्य रेल्वेच्या आणखी एका अपडेटमध्ये म्हटले आहे की, माटुंगा आणि सायन स्थानकांदरम्यान तांत्रिक समस्येमुळे मध्य रेल्वेच्या लोकलला 15 मिनिटे उशीर होत आहे. ओव्हरहेड वायरच्या समस्येमुळे अप जलद मार्गावर सुमारे 35 मिनिटे (सकाळी 7.45 ते सकाळी 8.20) लोकल ट्रेन अडकून पडली होती. यानंतर काही गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या त्यामुळे सर्व लोकल गाड्या जवळपास 15 मिनिटे उशिराने धावल्या.
(नोट - 8.30 ते 9 दरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.)
हेही वाचा