Advertisement

मुंबई मेट्रो 3 ची चाचणी पुढील आठवड्यात सुरू होणार

मेट्रो 3 म्हणजे एक्वा लाईनचा पहिला टप्पा मेअखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो 3 ची चाचणी पुढील आठवड्यात सुरू होणार
SHARES

बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-3 कधी सुरू होणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मेट्रो 3च्या अंतिम चाचण्यांना अखेर सुरुवात झाली आहे. त्यामुळं मेअखेरपर्यंत मेट्रो-3 सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो 3 पहिल्या टप्प्यात धावणार आहे. आरे ते वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्सपर्यंत (BKC)पर्यंत मुंबई मेट्रो 3 सुरू होणार आहे. यापूर्वी, मेट्रोच्या वेगाचे मुल्यांकन करण्यासाठी रिकाम्या डब्यांसह ड्राय रन आयोजित केल्या होत्या. 

रिकाम्या डब्यांसह चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता मेट्रोच्या आठ कोच असलेल्या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये बारीक खडीने भरलेल्या पिशव्या ठेवण्यात येणार आहे. या चाचणीचा उद्देश हा प्रवाशांचा भार सांभाळण्यासाठी या गाड्या कशा प्रकारे काम करतात याची खात्री करण्यासाठी आहे. या चाचण्या पुढील आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई मेट्रोच्या या चाचण्या सरळ व वळणदार ट्रॅकवर होणार आहेत. या वेळी सर्व खबरदारी घेऊनच या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. प्रवाशांसाठी ही सेवा खुली करण्याआधी मेट्रो प्रशासनाला कोणतीही त्रुटी आढळता कामा नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कारण प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. 

मुंबई मेट्रो 3 हा प्रकल्प 96 टक्कांपर्यंत पूर्ण झाला आहे. उर्वेरित काम हे स्टेशनचे सुशोभीकरण व किरकोळ काम बाकी आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड (एमएमआरसीएल)ने दिलेल्या माहितीनुसार, भूमिगत मेट्रो सुरू झाल्यानंतर दररोज 260 सेवा अंदाजे सुरू करण्यात येतील. तर, यामुळं अंदाजे 17 लाख प्रवासी प्रवास करतील. 

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा दुसरा टप्पाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. BKC ते आचार्य अत्रे चौक वरळी इथपर्यंत दुसरा टप्पा असणार आहे. पहिला टप्प्याचा एकूण खर्च 37,000 कोटींपर्यंत आहे. तर, आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा या मेअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात बीकेसीला कफ परेडला जोडण्यात येणार आहे. दुसरा टप्पा या ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. 

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची एकूण लांबी 33 किमी असून एकूण 27 स्थानके आहेत. पहिला टप्पा आरे ते बीकेसी दरम्यान आहे. या टप्प्यात 10 स्थानके असणार आहेत. हेही वाचा

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून मरिन ड्राईव्ह 15 मिनिटांत गाठा

कोस्टल रोड- सी-लिंकला जोडणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा