मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसचा प्रवास आता अणखी वेगवान होणार आहे. कारण, इंटरसिटी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूंना पुश-पूल पद्धतीचं इंजिन जोडण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी इंटरसिटी एक्स्प्रेसचा प्रवास जलद होण्यासाठी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूंना पुश-पूल पद्धतीनं इंजिन जोडून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली असून, गाडीचा वेग वाढून प्रवास वेळ ४० मिनिटांनी कमी झाला आहे.
मुंबई-पुणे मार्गावरील घाटातून जाण्यासाठी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूंना इंजिन जोडण्यात येतं. मात्र, ‘एलएचबी’ प्रकारातील गाड्यांच्या दोन्ही बाजूंना पुश-पुल पद्धतीचं इंजिन असल्यामुळं प्रवास आणखी वेगवान होतो. त्यामुळं इंटरसिटी एक्स्प्रेसच्या दोन्ही बाजूंना पुश-पुल पद्धतीचं इंजिन जोडून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असली, तरी या चाचणीनंतर आणखी एक अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास एक्स्प्रेसला पुश-पूल पद्धतीचं इंजिन जोडून चालवण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई या मार्गावरून अनेक प्रवासी प्रवास करत असल्यामुळं या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेगवान होण्यासाठी काही दिवसांपूर्वी ‘डेक्कन क्वीन’ला पुश-पूल पद्धतीचं इंजीन लावून चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळं इंटरसिटी एक्स्प्रेसची अंतिम चाचणी यशस्वी ठरल्यास येत्या काळात इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश-पूल पद्धतीचं इंजिन लावून चालण्यात येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -