Advertisement

मुंबईतील टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

उदय सामंत यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप देखील रिक्षा-टॅक्सी चालकांनी केला आहे.

मुंबईतील टॅक्सी चालक 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर
SHARES

मुंबईतील (Mumbai News) प्रवाशांना येत्या 26 सप्टेंबरपासून अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा 26 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर  जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

उदय सामंत यांनी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप देखील रिक्षा-टॅक्सी चालकांनी केला आहे. 

मुंबई टॅक्सी चालक 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत  होते.  मात्र, 13 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करत संप मागे घेण्याची विनंती केली.

मात्र  उदय सामंत यांनी बैठकीत दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिपत्रक काढत हा निर्णय जाहीर केला आहे.

टॅक्सी युनियनने भाडे 25 रुपयावरून 35 रुपयाची वाढ करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आधीच महागाई, त्यात भाडेवाढीने अधिक  मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

भाडेवाढ व्हावी यासाठी रिक्षा टॅक्सी आंदोलन करणार आहेत. त्यातच  सरकारने आणि या युनियनने बसून काहीतरी  मार्ग काढायला हवा, अन्यथा  सर्वसामान्यांचे हाल होणार आहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा