Advertisement

NMMT चे तिकीट दर अव्वाच्या सव्वा!

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि बेस्ट बस उपक्रमातर्फे नवी मुंबई ते मंत्रालयापर्यंत NMMT बस सेवा सुरू करण्यात आली.

NMMT चे तिकीट दर अव्वाच्या सव्वा!
SHARES

नवी मुंबई (navi mumbai) म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) बसने नवी मुंबई (navi mumbai) ते वर्ल्ड ट्रेड सेंटर असा प्रवास करणाऱ्या आणि ऑफिसला जाणाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

विशेषत: वाशी टोल नाका आणि ईस्टर्न फ्रीवेवर त्यामुळे कामाला उशीर होतो. दैनंदिन त्रास टाळण्यासाठी प्रवाशांनी मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोड ज्याला अटल सेतू म्हणूनही ओळखले जाते. त्या मार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) पर्यंत NMMT बस सेवेची मागणी केली. त्यानुसार बस सेवा सुरू झाली.

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आणि बेस्ट बस उपक्रमातर्फे नवी मुंबई ते मंत्रालयापर्यंत चालवल्या जाणाऱ्या 'चलो एसी' बस सेवेशी स्पर्धा करण्यासाठी NMMT ने या फेरीचा विचार केला. NMMT च्या वचनबद्धतेनुसार, त्यांनी नवी मुंबईतून अटल सेतू मार्गे दोन नवीन बस सेवांना हिरवा झेंडा दाखवला.

12 सप्टेंबर 2024 रोजी नेरूळ बस आगारातून बस क्रमांक 116 आणि खारघरमधील (kharghar) सेक्टर 35 मधून क्रमांक 117 बस फेऱ्या सुरू केल्या.

अटल सेतू मार्गे वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असलेले प्रवासी तिकीट भाडे (ticket price) ऐकून आश्चर्यचकित झाले. बस क्र.116 चे तिकीट भाडे रु. 230 आणि बस क्र. 117 चे तिकीट भाडे रु. 270 आहे.

बसमध्ये चढल्यानंतर काही प्रवासी फेरीचे भाडे समजल्यानंतर लगेचच खाली उतरू लागले. अनेक प्रवाशांनी सांगितले की, NMMT बससेवेचे भाडे खाजगी बस ऑपरेटर्स आणि चलोच्या भाड्यापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. 

सामान्य मध्यमवर्गीय लोकांना ते नक्कीच परवडणारे नाही. NMMT जर खाजगी बस ऑपरेटर्सच्या बरोबरीने भाडे कमी करण्यास नाखूष असेल तर, प्रवासी संख्येच्या अभावी लवकरच सेवा बंद करावी लागेल.



हेही वाचा

विकासासाठी मिठागरांचा ऱ्हास, मुंबईसाठी घातक

NITI आयोगानुसार मुंबईत 2030 पर्यंत होणार दुप्पट आर्थिक वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा