Advertisement

ओला-उबर टॅक्सीच्या चालक-मालकांचं आंदोलन, संपावर जाण्याची शक्यता


ओला-उबर टॅक्सीच्या चालक-मालकांचं आंदोलन, संपावर जाण्याची शक्यता
SHARES

ओला-उबर सेवांच्या चालक-मालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे. त्यानुसार सोमवारी ११ वाजता कुर्ला येथील फिनिक्स मॉल परिसरातील उबर कंपनीच्या कार्यालयावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे सोमवारी ओला-उबर सेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून या आंदोलनाचा प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


म्हणून आंदोलनाचं हत्यार उपसलं

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या दरात वाढ होत आहे. मात्र, तरीही ओला-उबरनं त्यांच्या भाडेदरात वाढ केलेली नाही. परंतु, चालक-मालकांचे प्रति किमी दर घटवल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघातर्फे करण्यात येत आहे.

चालक-मालकांचे प्रति किमी दर कमी केल्यामुळं त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे प्रत्येक किमीच्या दरात वाढ करण्यात यावी, कंपनीनं नव्या गाड्या ताफ्यात न आणता चालकांच्या गाड्यांना कामे द्यावीत, याशिवाय अन्य गाड्यांना व्यवसाय हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात येत आहेत.



हेही वाचा - 

राखी सावंतविरोधात तनुश्रीचा १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

घाटकोपरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा