नवरात्रीच्या काळात मुंबईत (mumbai) वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. मुंबई सेंट्रल (mumbai central), वडाळा (wadala) आणि अंधेरी (andheri) या शहरातील तीन प्रमुख आरटीओ (RTO) कार्यालयांमध्ये 7,000 हून अधिक वाहनांची नोंदणी झाली. वाहनांमध्ये कार (car), बाईक (bikes), टॅक्सी (taxis) आणि मालवाहकांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा सुमारे 210 वाहनांची वाढ झाली असून, 6,902 वाहनांची नोंदणी झाली आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याच्या परंपरेचा भाग म्हणून सणासुदीच्या काळात वाहनांची खरेदी केली जाते.
3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या तीन आरटीओमध्ये एकूण 7 हजार 111 वाहनांची नोंदणी झाली. यात एकूण 4,902 दुचाकी (two wheeler), तर 2,209 चारचाकी (four wheeler) वाहनांची नोंदणी झाली होती.
आरटीओची ठिकाणे | दुचाकी वाहनांची संख्या | चारचाकी वाहनांची संख्या |
मुंबई सेंट्रल | 1,921 | 823 |
वडाळा | 1,510 | 654 |
अंधेरी | 1,471 | 732 |
पनवेल आरटीओमध्ये जवळपास 2,500 नवीन गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे आरटीओमध्ये 4,500 हून अधिक नवीन गाड्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
ही आकडेवारी खाजगी वाहने विकत घेण्याचा लोकांचा वाढता कल दर्शविते. देशाच्या इतर भागातही असाच ट्रेंड दिसून आला.
चंदीगडमध्ये, शहरात 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान 1,861 वाहनांची नोंदणी झाली. गुजरातमध्ये, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या अंदाजानुसार केवळ दसऱ्याच्या दिवशी सुमारे 44,000 वाहने खरेदी केली गेली.
हेही वाचा