Advertisement

'या' रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद

रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड आता बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

'या' रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद
SHARES

मुंबईतील दादर, मुंबई सेंट्रल, सीएसटी, वांद्रे, कुर्ला इथं ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड (Prepaid Taxi Stand) सुरू करण्यात आले होते. मात्र हे प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड आता बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आरटीओ आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनने (Swabhimani Taxi Rikshaw Union) केला आहे.

प्रीपेड रिक्षा स्टॅण्ड ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यात आले. तसंच, ही ६ स्थानकं वेगवेगळ्या संघटनांना देण्यात आली होती. त्याशिवाय, युनियन टॅक्सीचालकांकडून (Taxi Drivers) १५ रुपये सेवा शुल्क घेत होती. मात्र, शुल्क कमी असतानाही संघटनेनं स्वत: पैसे खर्च करून स्टॅण्ड सुरु ठेवले, पण इतर संघटनांनी स्टॅण्ड बंद केले. त्यामुळे मुंबई सीएसएमटी (CSMT) हे एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू होते.

याबाबत करार करताना युनियनचा आरटीओशी (RTO) आणि आरटीओचा रेल्वेशी (Railway) करार झाला होता, पण आता कराराचे नूतनीकरण करताना आरटीओनं रेल्वेची जागा असल्याचं सांगत ती स्वत: परवानगी देऊ शकते, असं सांगत करार करण्यास नकार दिला. तर रेल्वेनं आरटीओची परवानगी आवश्यक असल्याचं सांगितलं. अन्यथा कंत्राट (Contract) पद्धतीनं टॅक्सी स्टॅण्ड (Taxi Stand) घेण्याची सूचना केली. कंत्राटमध्ये एका वर्षासाठी काही लाख रक्कम भरणं आवश्यक होतं.



हेही वाचा -

तुझ्या बापाचं राज्य आहे का? मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली

१० फेब्रुवारीपर्यंत 'आयडॉल'च्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा