Advertisement

1 ऑक्टोबरपासून 12 नवीन लोकल सुरू होणार

10 लोकल 15 डब्ब्यांच्या होणार, जाणून घ्या कुठल्या मार्गांवर धावणार

1 ऑक्टोबरपासून 12 नवीन लोकल सुरू होणार
SHARES

पश्चिम रेल्वेचा मुंबई मध्य विभाग (WR) 12 नवीन उपनगरी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे एकूण दैनंदिन सेवा 1,394 वरून 1,406 पर्यंत वाढतील. पुढील महिन्यापासून या सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर 12 नवीन लोकल आणि 10 अद्ययावत गाड्या येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण बदलामध्ये सीएसएमटी-बोरिवली ही हार्बर मार्गावरून तर चर्चगेट-विरार मार्गावर एक लोकल फेरी असेल. 

विभागामार्फत 12 नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्या सध्याच्या 1,394 वरून 1,406 पर्यंत वाढतील . याव्यतिरिक्त, 12 डब्ब्यांच्या 10 विद्यमान लोकल 15 डब्ब्यांच्या चालविण्यात येतील, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

12 नवीन लोकल फेऱ्यांमध्ये सहा लोकलचा विस्तार केला जाणार आहे. प्रत्येक दिशेने 3 आणि 16 इतर सेवांमध्ये बदल होतील. काही लोकल धीम्या मार्गावरून जलद सेवांमध्ये बदलण्यात येणार आहेत.

रेल्वे मंडळ दरवर्षी, ऑक्टोबरमध्ये नवे वेळापत्रक लागू करते. यावर्षी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही समायोजन येत्या जानेवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल.

पश्चिम रेल्वेची बोरिवली ते विरार पाचवी व सहावी मार्गिका तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी रेल्वेने 35 दिवसांचा ब्लॅकही जाहीर केला होता. मात्र गणेशोत्सवा दरम्यान मुंबईकर भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून तो लांबणीवर मेगा ब्लॅक टाकण्यात आला होता.

अशा असतील 12 लोकल

  • दादर आणि विरार दरम्यान - 4
  • विरार आणि चर्चगेट दरम्यान - 1
  • बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान - 1
  • चर्चगेट आणि अंधेरी दरम्यान - 2
  • चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यान - 3
  • चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान -1



हेही वाचा

फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात

गणेशोत्सवासाठी बेस्टकडून वडाळा डेपोत पे अँड पार्कची सुविधा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा