मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर कित्येक लोकांकडून काळा पैसा बाहेर येत आहे. काळा
पैसा पांढरा करण्यासाठी लोक विविध शक्कल लढवताना दिसतायेत. मात्र आता तर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या सुरेश प्रभूंच्या रेल्वे विभागात काळ्याचं पांढर होतं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेल्वेच्या व्हिजिलंस विभागाच्या एसडीजीएमकडून आलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की पीआरएस, बुकिंग विभाग, पार्सल विभाग आणि कॅश विभाग यांनी जुन्या नोटांबद्दलचे माहिती योग्यरित्या ठेवली नाही. तसेच काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कित्येक वेळा अनधिकृतपणे नोटा बदलल्या आहेत. मात्र अशा भ्रष्ट्र कर्मचाऱ्यांवर केंद्र सरकार ठोस कारवाई करणार नाही असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केलाय.