Advertisement

रे रोड ठरलं वायफाय असलेलं हजारावं हायफाय स्टेशन!

'रेलटेल'तर्फे भारतीय रेल्वेमध्ये एक हजार रेल्वे स्थानकांवर 'मोफत वाय-फाय' लावण्याचा टप्पा गुरुवारी पूर्ण करण्यात आला. यामध्ये हार्बर मार्गावरील रे रोड स्थानक हे देशातील १००० वं स्थानकानं ठरलं आहे.

रे रोड ठरलं वायफाय असलेलं हजारावं हायफाय स्टेशन!
SHARES

गुगल आणि भारतीय रेल्वेची दूरसंचार शाखा असलेली रेलटेल यांच्या सहकार्यानं प्रवाशांसाठी मर्यादित 'मोफत वाय-फाय सेवा' रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आली. तसंच, 'रेलटेल'तर्फे भारतीय रेल्वेमध्ये एक हजार रेल्वे स्थानकांवर 'मोफत वाय-फाय' लावण्याचा टप्पा गुरुवारी पूर्ण करण्यात आला. यामध्ये हार्बर मार्गावरील रे रोड स्थानक हे देशातील १००० वं स्थानकानं ठरलं आहे.


पहिलं स्थानक मुंबई सेंट्रल

रेलटेल अंतर्गत रेल वायरच्या माध्यमानं रेल्वे स्थानकात जलद आणि मोफत वाय-फाय सुविधा जानेवारी २०१६ रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरू करण्यात आली होती. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर वाय फाय सेवा पुरविण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. स्थानकातील मोठ-मोठ्या भिंती, स्थानकांचा पुर्नविकास, स्थांनकांवरील बांधकामांमुळं वाय फायच्या नेटवर्कमध्ये अनेक अडथळे निर्माण होत होते, असं रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी सांगितलं.


४७१९ स्थानकांवर वाय फाय  

रेलटेलनं टाटा ट्रस्टसोबत संपुर्ण भारतात बी, सी, डी आणि ई श्रेणिच्या अंतर्गत येणाऱ्या ४७१९ स्थानकांवर वाय फाय सेवा उपलब्ध करण्याचा करारा केला होता. 



हेही वाचा -

लसिथ मलिंगाचा अखेरचा चेंडू होता नो बॉल, सामन्यानंतर विराटनं सुनावलं पंचांना

जगात सर्वात परवडण्याजोग्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा