Advertisement

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांसाठी भरती
SHARES

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह अनेक महत्त्वाच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. 

महाराष्ट्र मेट्रोकडून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. २१ जानेवारी २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन, इंजिनिअरसह सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. टेक्निशियन पदासाठी दहावी पास असलेले उमेदवार एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त संस्थेकडून आयटीआय प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतात.

तर स्टेशन कंट्रोलर आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबंधित तीन वर्षांचा डिप्लोमा पास असणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर, विभाग अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेकडून बीई किंवा बीटेक पास असणं आवश्यक आहे.

या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये फी भरावी लागणार आहेत. तर इतर श्रेणींसाठी १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा