कोरोनाव्हायरसचा उद्रेक आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे राज्यात वाहनांची विक्री जवळपास २३ टक्क्यांनी घटली आहे. परंतु कृषी क्षेत्राच्या कामकाजामुळे याच काळात ट्रॅक्टरच्या विक्रीत १६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनलॉक ५ मध्ये अर्थव्यवस्था जून महिन्यापासून सुरळीत होऊ लागली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात प्रवासी वाहनांच्या सर्वाधिक २३ हजार ०७६ नोंदणी झाल्या. ऑगस्ट २०१९ च्या विक्रीच्या तुलनेत ही आकडेवारी केवळ ४ टक्क्यांनी कमी झाली. दरम्यान, महाराष्ट्र सरकारनं ३० सप्टेंबर २०२० रोजी ३१ ऑक्टोबर, २०२० पर्यंत राज्यव्यापी लॉकडाऊन लागू केला. तथापि, राज्यानं ५ ऑक्टोबर २०१० पासून ५० टक्के क्षमतेनं हॉटेल आणि रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती.
आवश्यक सेवांमध्ये असलेल्या डबेवाल्यांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सरकारनं रेल्वे अधिकाऱ्यांना जादा ट्रेन चालू करण्यास परवानगी देण्यास सांगितलं आहे.
हेही वाचा