Advertisement

सायन रोड ओव्हर ब्रिज बंद झाल्याचा फटका बेस्टच्या 200 बसेसना

काही फेऱ्या बंद कराव्या लागतील. तर काही फेऱ्यांच्या ठिकाणांमध्ये बदल करावा लागेल.

सायन रोड ओव्हर ब्रिज बंद झाल्याचा फटका बेस्टच्या 200 बसेसना
SHARES

112 वर्षे जुना सायन (Sion) रोड ओव्हर ब्रिज (ROB) 1 जुलैपासून बंद केल्याने 23 वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या सुमारे 200 बेस्ट (BEST) बसेसचा प्रवासाचा वेळ वाढणार आहे. ज्यामुळे, शहरातील सुमारे 2 लाख प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले.

या 23 मार्गांवर चालणाऱ्या बसेस पूर्वी सायन ब्रिजवरून जात होत्या.  आता, त्यापैकी बहुतेक सुलोचना सेठी मार्ग, धारावी टी-जंक्शन, राणी लक्ष्मीबाई चौक आणि कलानगर मार्गे धावतील,” असे बेस्टच्या प्रवक्त्याने सांगितले.

सायन रोड ओव्हर ब्रिज (ROB) हे धारावी, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. यासोबतच नेव्ही नगर, अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर, ट्रॉम्बे, सांताक्रूझ, वांद्रे, दिंडोशी, जुहू, मरोळ, विक्रोळी आणि शिवाजी नगर यासह शहरातील विविध भागांतील 23 मार्गांवरून या बसेस धावतात.  

सरासरी, या प्रत्येक मार्गाच्या प्रवासाच्या वेळेत 15-20 मिनिटांची भर पडेल. तसेच काही मार्गांवरील बस सेवा कमी करावी लागेल. तर, काही ठिकाणी मार्गांमध्ये बदल केले जातील, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बेस्टच्या (BEST) बसेसना आधीच उशीर होत असून आता सायन रोड ओव्हर ब्रीज बंद केल्यामुळे प्रवाशांची आणखी गैरसोय होणार आहे. बेस्टला अधिक बसेस चालवण्याची गरज आहे,” असे सायनचे रहिवासी एच व्होरा यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT-Bombay) च्या शिफारशींच्या आधारावर 1 जुलैपासून सायन रोड ओव्हर ब्रिज (ROB) 2.8 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या अवजड वाहनांसाठी आणि ऑटोमोबाईलसाठी बंद करण्यात आला होता. IIT ने 2020 मध्ये या पुलाला असुरक्षित ठरवले होते. 

 IIT-Bombayच्या अहवालानुसार, प्रलंबित सिमेंट काँक्रीट डेक स्लॅब आणि पुलाची पॅरापेट भिंत कमकुवत झाली होती आणि संरचनेवर झाडे आणि मुळे वाढली होती, ज्यामुळे पुलाच्या पायावर परिणाम होत असल्याचे सांगितले होते. 

सीएसएमटी आणि कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनसाठी जागा तयार करण्यासाठी अखेरीस रोड ओव्हर ब्रिज (ROB) पाडला जाईल. सध्याच्या 30 मीटरच्या तुलनेत 49 मीटरच्या वाढीव अंतराने नवीन रोड ओव्हर ब्रिज (ROB) त्याच्या जागी उभारला जाईल.



हेही वाचा

Maharashtra Budget 2024 : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात पेट्रोल, डिझेलचा दर कमी होणार

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या आणखी वाढण्यात येण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा