वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर आधीच हैराण आहेत. या परिस्थितीत प्रवाशांचा अधिक ओढा एसी लोकलकडे आहे. पण आता प्रवासी एसी लोकलच्या वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक कारणामुळे त्रस्त झाले आहेत.
मुंबईकराना बुधवारी एसी लोकलच्या तांत्रीक बिघाडामुळे मोठी गैरसोय झाली आहे. विरार- चर्चगेट जलद एसी लोकलमधील दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा काम करत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा श्वास कोंडला होता.
अखेर वांद्रे स्थानकात एसी लोकलला थांबवून बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे चर्चगेटचा दिशेने जाणाऱ्या लोकल सेवांचा वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७.५६ मिनिटांची विरार-चर्चगेट जलद लोकलच्या दोन डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बिघडली. त्यानंतर वातानुकूलित यंत्रणांमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवाशांना श्वास गुदमरात होता. प्रवाशांना सुद्धा प्रचंड उष्णतेचा त्रास होत असल्याने प्रवाशांनी यांसंदर्भात रेल्वेकडे तक्रार केली.
प्रवासी लोकलचा दरवाजा बंदच होऊन देत नसल्याने भाईंदर, मीरा रोड, दहिसर, बोरिवली या स्थानकावर लोकल जादा वेळ थांबवण्यात आली. त्यानंतर वांद्रे स्थानकांवर या एसी लोकलला थांबवण्यात आली. हा बिघाडा दुरुस्त करण्यात आला आहे, त्यानंतर लोकल चर्चगेट दिशेकडे रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा एकामागेएक खोळंबल्या होत्या. परिणामी अनेक जलद लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
हेही वाचा