Advertisement

डाॅ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे, बसची सोय

मध्य रेल्वेनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला १२ विशेष उपनगरी लोकल व १४ विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेस्टही विशेष बस सेवा पुरवणार आहे.

डाॅ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे, बसची सोय
SHARES

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे आणि बेस्टतर्फे आंबेडकरी अनुयायांसाठी विशेष ट्रेन आणि बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सेवा ४ डिसेंबर ते ६ डिसेंबर या दरम्याान उपलब्ध असणार आहे.

  • बेस्ट उपक्रमांतर्गत ४ ते ६ डिसेंबर पर्यंत दादर स्थानक (प.) ते शिवाजी पार्क संपूर्ण दिवस अतिरिक्त बसफेऱ्या कार्यरत राहतील. विशेषत: ५ डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र आणि ६ डिसेंबर रोजी २४ तास बससेवा कार्यरत राहिल.
  • बोरिवली स्थानक (पूर्व) ते कान्हेरी गुंफा दरम्यान बसमार्ग क्र. १८८ स. ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे.
  • मालाड स्थानक (प.) ते मार्वे चौपाटी दरम्यान स. ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत बसमार्ग क्र. २७२ बससेवा चालविण्यात येणार आहे.
  • बोरिवली स्थानक (प.) ते गोराई खाडी दरम्यान स. ९ ते रात्री १० वाजेपर्यंत बसमार्ग क्र. २४७ आणि २९४ या मार्गावर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहेत.
  • दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजल्यापासून बसमार्ग क्र. २४१ वडाळा ते मालवणी आगार, ३५१ मुंबई सेंट्रल आगार ते टाटा वीज केंद्र, ३५४ शिवाजीपार्क ते कन्नमवार नगर (विक्रोळी) रात्रभर बससेवा चालवण्यात येईल.

दि. ६ डिसेंबर रोजी स.८.०० ते रात्री उशीरापर्यंत मुंबईतील विविध परिसरामधून शिवाजी पार्क, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) या परिसरामध्ये प्रवर्तित होणाऱ्या बसमार्गावर संपूर्ण दिवस अतिरिक्त बसगाड्या कार्यरत असणार आहेत.


डॉ. आंबेडकर मुंबई दर्शन सेवा

बेस्ट उपक्रमातर्फे चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांसाठी मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळांना भेट देण्याची संधी अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येते. या बस सेवेकरीता प्रती प्रवासी १५० रुपये भाडे आकारण्यात येते. शिवाजी पार्क आणि वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) इथं या सेवेचं तिकीट उपलब्ध करण्यात येणार आहे. ही बस, सकाळी ८.००, ८.३०, ९.००, ९.३० आणि १०.०० वा. शिवाजीपार्क येथून सुटेल.


विशेष लोकल, एक्स्प्रेस

मध्य रेल्वेनेही ६ डिसेंबरला १२ विशेष उपनगरी लोकल व १४ विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ५ डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वे मार्गावर दादर-ठाणे १.१५ वा., दादर-कल्याण २.२५ वा., दादर-कुर्ला ३.०० वा., कुर्ला-दादर १२.४५ वा., कल्याण-दादर १.०० वा., ठाणे-दादर २.१० वाजता लोकल सुटतील.

मध्यरात्री हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला-मानखुर्द २.३० वा., कुर्ला-पनवेल ३.०० वा., कुर्ला-वाशी ४.०० वा., वाशी-कुर्ला १.३० वा., पनवेल-कुर्ला १.४० वा., मानखुर्द-कुर्ला ३.१० या वेळेत गाड्या चालविण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणं १४ विशेष अनारक्षित गाड्याही असणार आहेत. नागपूर स्थानकातून सीएसएमटीकरीता गाडी क्र. १०२६२ ही ४ डिसेंबरला रात्री ११.५५ ला सुटणार आहे. गाडी क्र. ०१२६४ ही ५ डिसेंबरला सकाळी ७.५० वा. सुटणार असून गाडी क्र. ०१२६६ ही ५ डिसेंबरला दुपारी ३.५५ ला सुटणार आहे.

सीएसएमटी ते सेवाग्राम-अजनी-नागपूरकरीता ६ गाड्या धावणार आहेत. गाडी क्र. ०१२४९ ही सीएसएमटी स्थानकातून ६ डिसेंबरला दुपारी ४.०५ वाजता सुटेल. गाडी क्र. ०१२५१ ही सीएसएमटी स्थानकातून संध्याकाळी ६.४० वा. सुटेल. गाडी क्र. ०१२५३ ही ६ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता दादर स्थानकातून सुटणार असून गाडी क्र. ०१२५५ ही सीएसएमटी स्थानकातून ७ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०१२५७ सीएसएमटी येथून ८ डिसेंबरला संध्याकाळी ६.४० वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०१२५९ दादर स्थानकातून ७ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.४० वा. सुटणार आहे.

अजनी येथून गाडी क्र. ०२०४० ही ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०१३१५ सोलापूरहून ५ डिसेंबरला संध्याकाळी ५.२० वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०१३१६ सीएसएमटी येथून ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०७०५८ आदिलाबाद येथून ५ डिसेंबरला सकाळी ७ वाजता सुटणार आहे. गाडी क्र. ०७५७ दादर येथून ६ डिसेंबरच्या मध्यरात्री १२.५० वाजता सुटणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा