येत्या काही काळात राजधानी एक्स्प्रेसचा स्पीड आणखी वाढलेला अनुभवायला मिळणार आहे. राजधानी एक्स्प्रेसने मुंबई ते दिल्लीपर्यंतचे अंतर गाठण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तासाची बचत होणार आहे. पश्चिम रेल्वेतर्फे वांद्रे टर्मिनस ते दिल्लीपर्यंत जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसची इंजिन क्षमता वाढवण्यासाठी नवीन शक्कल लढवली जाणार आहे.
पहिल्यांदाच होणार बदल
वेगाप्रमाणेच एक्स्प्रेसला गती (पिकअप) देण्यासाठी गार्डच्या दिशेकडे इंजिन जोडले जाणार आहे. या पुश आणि पूल पद्धतीमुळे एक्स्प्रेसच्या संपूर्ण प्रवासाच्या वेळेत बचत शक्य होणार आहे. देशभरातील रेल्वे यंत्रणेत यापद्धतीने पहिल्यांदाच बदल केलं जाणार आहेत.
विशेष गाडीचा वेग ताशी १३० किमी
भारतीय रेल्वेची शान असलेल्या राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास हा शताब्दी एक्स्प्रेससारख्या गाड्यांचा अपवाद वगळता वेगवान आहे. सध्या वांद्रे टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडीचा वेग ताशी १३० किमी प्रतितास इतका आहे. त्यातून एकूण प्रवासात १६ तास लागत असून हा कालावधी कमी करण्यात यावा, अशी सूचना वारंवार केली जाते. पण, वेग आणि गतिमानतेच्या अडचणीमुळे ते आतापर्यंत शक्य झालं नव्हतं. त्यासाठी पहिल्यांदा पश्चिम रेल्वेने मालगाडीला दोन इंजिन जोडून प्रयोग केला. त्यात यश आल्यानंतर वांद्रे टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडीला त्याप्रमाणे पुढे आणि मागे प्रत्येकी एक इंजिन जोडले जाणार आहे.
यामुळे गाडीचा वेग वाढणार
राजधानी एक्स्प्रेसमध्ये २४ डब्बे असून आतापर्यंत एकापाठोपाठ दोन इंजिनाची मिळून सुमारे १० हजार अश्वशक्तीतून गाडी चालवली जाते. परंतु, त्यामुळे गाडीच्या गतिमानतेवर परिणाम होत असल्यानं दुसरे इंजिन हे गार्डकडील भागात जोडले जाणार आहे. त्यातून एकाचवेळी संपूर्ण गाडीला दोन्ही बाजूने समान क्षमतेने ताकद मिळू शकेल. त्यातून गाडीचा वेग वाढण्यास सहाय्य मिळणार आहे. त्याजोडीला जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा त्याला वेग, गती मिळण्यासाठी काही मिनिटांचा अवधी लागतो. हा अवधी दोन्ही इंजिनमुळे पूर्णपणे कमी होणार आहे.