एलोन मस्कच्या मालकीची परवडणारी सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक भारतात अखेर आपली सेवा सुरू करण्यास सज्ज होत असताना, त्यांचा दुसरा उपक्रम, इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (tesla) या महिन्यापासून भारताता आपला टेस्ला कार उपक्रम सुरू करणार आहे.
सध्या देशात उत्पादन सुरू नसले तरी, कंपनी 15 जुलै रोजी मुंबईत (mumbai) आपले पहिले शोरूम (showroom) उघडण्याच्या तयारीत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील टेस्ला शोरूम 4,000 चौरस फूट रिटेल जागेत आहे, जे शहरातीलच अमेरिकन टेक जायंट अॅपलच्या फ्लॅगशिप स्टोअरच्या जवळ आहे.
हे पाऊल टेस्लाच्या भारतातील व्यापक विस्तार धोरणाचा एक भाग आहे. जूनमध्ये, कंपनीने मुंबईतील (mumbai) कुर्ला पश्चिम (kurla) येथे एक व्यावसायिक जागा भाड्याने घेतली, जी टेस्ला कारचे शोरुम असणार आहे.
टेस्लाकडे आता भारतात चार व्यावसायिक मालमत्ता आहेत, ज्यात पुण्यातील अभियांत्रिकी केंद्र, बेंगळुरूमधील नोंदणीकृत कार्यालय आणि बीकेसीजवळील तात्पुरते कार्यालय समाविष्ट आहे.
टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे 24,500 चौरस फूट जागा भाड्याने घेतली होती, जेणेकरून ते बीकेसीमधील (bkc) त्यांच्या आगामी शोरूमजवळ एक सेवा केंद्र स्थापन करू शकतील.
टेस्लाच्या भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या योजनेतील हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र सध्या देशात टेस्ला कंपनीची वाहने तयार करण्याचा कंपनीचा कोणताही विचार नाही.
प्रॉपर्टी डेटा अॅनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्सने मिळवलेल्या रिअल इस्टेट कागदपत्रांनुसार टेस्लाने लोढा लॉजिस्टिक्स पार्कमधील जागा भाड्याने देण्यासाठी सिटी एफसी मुंबई आय प्रायव्हेटमधील बेलिसिमोसोबत भाडेपट्टा आणि परवाना करार केला.
हा करार पाच वर्षांसाठी असून याचे सुरुवातीचे मासिक भाडे 37.53 लाख रुपये आहे. कागदपत्रांनुसार, संपूर्ण भाडेपट्टा कालावधीत टेस्ला एकूण सुमारे 25 कोटी रुपये देईल, ज्यामध्ये 2.25 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव समाविष्ट आहे.
टेस्लाने हे स्पष्ट केले आहे की त्यांचे सध्याचे हित फक्त भारतात त्यांच्या वाहनांची विक्री करण्यात आहे त्यांची निर्मिती करण्यात नाही.
"त्यांना भारतात उत्पादन करण्यात रस नाही," असे केंद्रीय उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. त्यांनी पुढे सांगितले की टेस्ला भारतात केवळ विक्रीसाठी शोरूम उघडण्याची योजना आखत आहे.
सरकारने इलेक्ट्रिक कार विभागात जागतिक उत्पादकांकडून नवीन गुंतवणूक सक्षम करण्यासाठी आणि भारताला ई-वाहनांसाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या भविष्यकालीन ईव्ही योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत.
हेही वाचा