Advertisement

लोकलच्या प्रवाशांना दिलासा, बुधवारपासून मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सुरू

लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनानं मोठा दिलासा दिला आहे.

लोकलच्या प्रवाशांना दिलासा, बुधवारपासून मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सुरू
SHARES

लोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनानं मोठा दिलासा दिला आहे. अखेर युटीएस अॅप हे महाराष्ट्र सरकारच्या युनिर्व्हसल पास पोर्टलशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे युटीएस अॅपमधून तिकिट घेताना संबंधित प्रवाशाचे लसीकरण झाले असल्याची खातरजमा होणार आहे.

मोबाइल तिकिटींग अॅप युटीएस सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात रेल्वे प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर युटीएस अॅपवरून तिकिट बुकिंग बंद करण्यात आले होते.

कोरोना काळात मुंबईची लाइफ लाइन समजली जाणारी लोकल रेल्वे बंद ठेवण्यात आली होती. आपात्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर लोकल प्रवासाची मागणी वाढू लागली होती.

अखेर रेल्वे प्रशासनानं १०  महिन्यानंतर सामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास सुरू केला. कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, युटीएस अॅपमधून तिकिट बुकिंग करण्याची मुभा देण्यात आली नव्हती.

सरकारनं रेल्वेला पत्र लिहून लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावं अशी विनंती केली होती. त्यासाठी रेल्वेनं अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारच्या पत्रात होत्या.



हेही वाचा

एसटीचे २० संपकरी कामगार रुग्णालयात; बदलत्या हवामानाचा फटका

एसी लोकलच्या आणखी ८ फेऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा