Advertisement

गेटवे ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद

मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे.

गेटवे ते अलिबाग जलवाहतूक तीन महिने बंद
SHARES

मांडवा ते गेट वे या मार्गावर सुरू असणारी जलवाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट या जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळादरम्यान बंद राहणार आहे.

मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. 

पावसाळा सुरू होण्याआधी आठ दिवस अगोदर जून महिन्यात जलवाहतूक सेवा बंद केली जाते. त्यानुसारच मेरी टाइम विभागाने जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्र देत वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे पर्यटनावर परिणाम होऊ शकतो. अलिबागला जाण्यासाठी या जलवाहतुकीची मोठ्या प्रमाणावर मदत होते. अनेक कंपन्या जलवाहतुकीची सेवा पुरवतात. त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.

26 मे पासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या काळात रो-रो बोट सेवा सुरू राहील. पण ही सेवाही हवामान कसे असेल त्यानुसार सुरू असणार आहे. त्यामुळे आता पुढचे तीन महिने प्रवाशांना जलवाहतूकीऐवजी रस्त्याचा पर्याय असणार आहे.

फक्त वीकेंडच नव्हे, तर दर दिवशी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. पण, आता मात्र या मंडळींच्या प्रवासाची वेळ वाढणार असून, त्यांना रस्ते मार्गाला प्राधान्य द्यावं लागणार आहे. दरम्यान, भाऊच्या धक्क्यावरून M2M रोरो फेरी सेवा मात्र सुरु राहणार असल्यामुळं प्रवाशांना काहीसा दिलासा असेल. 

रस्तेमार्गानं अलिबाग आणि नजीकच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतून अनुक्रमे साडेचार आणि तीन तासांचा कालावधी लागतो.

पण, जलवाहतुकीचा पर्याय निवडल्या हा प्रवास अवघ्या तासाभरात किंवा त्याहून कमी वेळात पूर्ण करता येतो. पण, ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा, One Day Picninc चं प्रमाण वाढतं तेव्हाच ही जलवाहतूक बंद असणार आहे. ज्यामध्ये मालदार, अजंठा, पीएनपी आणि वेळप्रसंगी अपोलो सेवाही बंद राहण्याची माहिती मिळत आहे. 

भाऊचा धक्का ते रेवस जेट्टी या मार्गावरून सुरु असणाऱ्या जलवाहतुकीवरही मान्सूनदरम्यान परिणाम होत असल्यामुळं ही सेवाही ठप्पच असते. पण, रो- रो सेवा सुरु असल्यामुळं अलिबाग गाठणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा