वलसाड (valsad) फास्ट पॅसेंजर या गाडीच्या डबल डेकरचा (double decker train) काळ संपुष्टात येत आहे. तसेच या पद्धतीचे डबल डेकर डबे उपलब्ध नसल्याने या गाडीला 5 जानेवारी 2025 पासून इतर एक्सप्रेस, शटल आणि पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने (western railway) मंजूर केला आहे.
या प्रस्तावात वलसाड, सुरत, बडोदा दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचे डब्बे कंपनीने वापरण्याचे ठरवले आहे. तसेच काही पॅसेंजर गाड्यांचे गंतव्यस्थान व थांबे बदलण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहेत.
सध्या 11 डबल डेकर डबे असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर ला एकूण 18 डबे आहेत. यात नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रचनेत ही गाडी 22 डब्यांची करून त्यामध्ये 15 सिंगल डेकर डबे, तीन वाईस फर्स्ट क्लास व प्रत्येकी दोन मालवाहू डबे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
हा बदल 5 जानेवारी पासून करण्यात येणार आहे. वलसाड फास्ट पॅसेंजर च्या डब्यांच्या रचनेत बदल करताना या गाडीचा रेक चा वापर वापी पॅसेंजर, वलसाड मुंबई (mumbai) फास्ट पॅसेंजर, वलसाड भरूच एक्सप्रेस, बलसाड विरार एक्सप्रेस, विरार (virar) सुरत शटल, सुरत विरार शटल व विरार वलसाड शटल या गाड्यांसाठी आलटून पालटून करण्याचा विचाराधीन आहे.
यामुळे या सर्व गाड्यांच्या डब्ब्यांची रचना एकाच पद्धतीची ठेवण्यास पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे.