Advertisement

'गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको' संतापजनक पोस्ट

महिला HR ची संतापजनक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

'गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको' संतापजनक पोस्ट
SHARES

मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही, एका कंपनीच्या HR रिक्रूटरने लिंक्डइनवर शेअर केलेली ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही HR गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका कंपनीच्या HR नं लिंक्डइनवर केलेल्या एका पोस्टमुळे वाद सुरू झाला आहे. HR मुंबईतील एका कंपनीसाठी असलेल्या एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. पण हे सगळं सांगत असताना तिनं अशी एक अट ठेवली ज्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.



कंपनीच्या HR नं उमेदवाराच्या शोधात असल्याचं सांगत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्या HR नं सांगितलं की मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याहून जास्त असा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला कोणत्या कोणत्या गोष्टी या उमेदवाराकडून अपेक्षित आहे हे सांगितलं. सगळ्यात आधी असलेली अट ही होती की मराठी माणसाला इथे अर्ज करण्यास परवानगी नाही किंवा मराठी माणूस इथे अर्ज करु शकत नाही. 

ट्विटर अकाऊंटवरून नेटकऱ्यांनी त्या HR च्या त्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. एका नेटकऱ्यानं भेदभाव सुरू असल्याचं म्हटलं. त्यानंतर इतर नेटकऱ्यांनी देखील तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.  हे पाहता काही काळानंतर ती पोस्ट सोशल मीडियावर डिलीट करण्यात आली. 

HR नं तिच्या प्रोफाइलवरून ही पोस्ट काढून टाकल्यानंतरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणं थांबवलं नाही. त्यांनी पुढे हे स्क्रिन शॉट शेअर करत तिच्या विरोधात तक्रार करा असं म्हटलं आहे.

यासगळ्या प्रकरणातं गांभीर्य समजताच त्या HR नं एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी उमेदवार शोधत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये असलेल्या फक्त एका वाक्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी अशाप्रकारे कोणाविरुद्धही कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही. माझ्या नजर चुकीमुळे मी ती पोस्ट इथे केली होती.

ट्विटरवर एका वापरकर्त्याने लिहिले, "मराठी लोकांविरुद्ध भेदभाव.... नोकरीच्या ठिकाणी काही लोकांविरुद्ध भेदभाव पाहणे वाईट आहे, हे कायदेशीर आहे का?"

आणखी काहीजण पुढे म्हणाले, “मराठी लोक सर्वात जास्त स्वागतार्ह आहेत आणि हे लोक आदरातिथ्याची परतफेड कशी करतात? हा पुढच्या स्तरावरचा निर्लज्जपणा आहे. कृपया हा भेदभाव थांबला पाहिजे."

“व्यावसायिक व्यासपीठावर वर्णद्वेष,” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

आणखी एका यूजरने लिहिले की, “मराठी लोकांना भेदभावाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मराठीचा त्यांच्याच मातीत महाराष्ट्रात बहुतेक गुजराती, मारवाडी द्वेष करतात. आम्ही अतिशय सर्वसमावेशक, सर्वांचे स्वागत करणारे आहोत. मराठी लोकांना त्यांच्या आहारातील प्राधान्यांमुळे मुंबईत फ्लॅट नाकारण्यात आले आहेत. बिल्डर मराठी लोकांना फ्लॅट विकत नाही.



हेही वाचा

एप्रिलमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ

NMMC ने नवी मुंबईत 535 आणि पनवेलमध्ये 79 धोकादायक बांधकामे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा