कोरोना नियंत्रणाच्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेने घेतल्यानंतर आता ऑक्सफर्ड विद्यापीठानेही घेतली आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला. त्याचप्रमाणे ओदिशातील गंजामचे मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या कामाचीही दखल घेण्यात आली आहे.
कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरते. त्यामुळे लहान लहान भागातील रुग्णांवर आणि तेथील परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करायला हवं, यावर ऑक्सफर्ड विद्यापीठाने अभ्यास केला. यासाठी जगातील ३१० शहरांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात ओदिशातील गंजाम आणि महाराष्ट्रातील धारावीचा उल्लेख केला आहे. या दोन्ही ठिकाणांचं
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत सुरूवातीला कोरोनाचा फैलाव वेगाने झाला होता. मुंबई महापालिका, डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळे धारावी कोरोनाशी लढा देणाऱ्या जगभरातील देशांसाठी एक आदर्श बनला आहे.