मुंबई - मराठी भाषेचे संवर्धन ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी असून, त्यासाठी आपण विविध उपाययोजना राबवित आहोत. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर-वाई येथील भिलार गावात पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून राज्यभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तावडे बोलत होते.
भिलार येथे पुस्तकाचे गाव तयार करताना येथे सर्व घरे निवडण्यात आली असून, येथे सर्व प्रकारची पुस्तके एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. यानिमित्ताने सर्व साहित्यिक, लेखकांनी दिवाळी अथवा इतर सुट्टीच्या कालावधीत या गावात जाऊन तेथील वाचकांशी संवाद साधल्यास वाचक आणि लेखकांचे नाते अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात सर्व शाळांनी वर्षातून एकदा तरी पुस्तकाच्या गावात सहल नेऊन विद्यार्थ्यांना याची माहिती द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले.
यावेळी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार यांनी ‘धन मराठी, धून मराठी, धन्य मराठी’ हा मराठी भाषा ही मध्यवर्ती संकल्पना असलेला सांगितिक कार्यक्रमही सादर केला. यावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
नाव | पुरस्कार |
डॉ. प्रभा गणोरकर | कवी केशवसूत पुरस्कार |
रमेश नाईक | राम गणेश गडकरी पुरस्कार |
बा. भो. शास्त्री | हरी नारायण आपटे पुरस्कार |
प्रकाश बाळ जोशी | दिवाकर कृष्ण पुरस्कार |
नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी | अनंत काणेकर पुरस्कार |
प्रतिमा इंगोले | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार |
सुहास बहुळकर | न. चि. केळकर पुरस्कार |
डॉ. उज्ज्वला सहाणे | लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार |
सुधीर रसाळ | के. क्षीरसागर पुरस्कार |
रमेश पतंगे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार |
संजीवनी खेर | शाहू महाराज पुरस्कार |
रामदास भटकळ | नरहर कुरूंदकर पुरस्कार |
मृदुला प्रभुराम जोशी | नरहर कुरूंदकर पुरस्कार |
रमेश नारायण वरखेडे | महात्मा जोतिराव फुले पुरस्कार |
डॉ. नितीन मार्कण्डेय | वसंतराव नाईक पुरस्कार |
श्रीराम पेडगावकर | सी.डी. देशमुख पुरस्कार |
दिलीप घोंडगे | ना. गो. नांदापूरकर पुरस्कार |
हेरंब कुलकर्णी | कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार |
बी. के. कुलकर्णी | डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार |
संपादक द. दि. पुंडे | रा. ना. चव्हाण पुरस्कार |
अनुवादक अश्विनी भिडे-देशपांडे | तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार |
डॉ. गिरीश जोखोटिया | भाई माधवराव बागल पुरस्कार |
डॉ. माणिक बंगेरी | सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार |
इग्नेशिअस डायस | बहिणाबाई चौधरी पुरस्कार |
नितीन थोरात | श्री. ना. पेंडसे पुरस्कार |
ऋषिकेश वांगीकर | ग. ल. ठोकळ पुरस्कार |
संदेश कुलकर्णी | ताराबाई शिंदे पुरस्कार |
राजेंद्र सलालकर | रा. भा. पाटणकर पुरस्कार |
ज्ञानदा आसोलकर | बालकवी पुरस्कार |
डॉ. भारती सुदामे | साने गुरूजी पुरस्कार |
डॉ. सुमन नवलकर | राजा मंगळवेढेकर पुरस्कार |
मधुकर धर्मापुरीकर | ना. धो. ताम्हणकर पुरस्कार |
राजीव तांबे | यदुनाथ थत्ते पुरस्कार |