Advertisement

मुंबईचा राजा लवकरच पोस्ट पाकिटावर


मुंबईचा राजा लवकरच पोस्ट पाकिटावर
SHARES

लालबागमधल्या गणेशगल्लीच्या राजाचे आता पोस्ट पाकीट मिळणार आहे. 10 सप्टेंबरला या पोस्ट पाकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. मुंबईतले पोस्टमन 10 सप्टेंबरला प्रथम बाप्पाची आरती करून पोस्ट पाकिटाचं अनावरण करणार आहेत.  आता व्हॉट्सअप सारख्या सुविधा आल्या. परंतु पूर्वीपासून दळणवळणाची सोय नसताना उन्हा-तान्हातून पोस्टमन पत्र पोहोचवायचे. त्यामुळे मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान मंडळानं पोस्टमनला दिलाय.  

पोस्टमनच्या आग्रहास्तव मंडळानं मुंबईच्या राजाचे पोस्ट पाकीट काढण्याचा निर्णय घेतला. तर पोस्ट पाकिटासाठी मंडळानं 25 हजार रुपये रॉयल्टी भरली आहे. पोस्ट पाकिटावर दिवंगत मूर्तिकार दीनानाथ वेलिंग यांनी साकारलेली गणरायाची अजरामर कमळावरील मूर्तीचे छायाचित्र आहे. तसंच थोडक्यात मंडळाची माहिती देण्यात येणार असल्याचं मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले.        

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा