सेव आरे या संघटनेनं पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झाडे लावा मोहीम हाती घेतली आहे. यंदा सेव आरेच्या स्वयंसेवकांनी आरेतील पडीक जागेवर 150 जातींच्या वृक्षांचं रोपण केलं. या मोहिमेत सेव आरेसह अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवला. पुढील 3 वर्ष या रोपांची देखभाल सेव आरे संघटना घेणार, असं आरेचे संचालक मनिष गडीया यांनी सांगितलं.