Advertisement

लोकरंग महोत्सवाचा गोड समारोप!


लोकरंग महोत्सवाचा गोड समारोप!
SHARES

'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास' या संस्थेतर्फे आयोजित केलेला 'लोकरंग महोत्सव २०१८-प्रवास परंपरेचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता शुक्रवारी दामोदर हॉल, परळ येथे झाली. गेले ३ दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाला मुंबईच्या रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.


अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाची जादू!

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. या वेळी 'चांदणं चांदणं झाली रात' हे गाणं गात अनुराधा पौडवाल यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी 'वेसावकर अॅण्ड ग्रुप'ने सादर केलेल्या दर्याचा राजा या कोळी गीतांवर प्रेक्षकांनीही ताल धरला.


जुन्या-नव्या शाहिरांची मैफल

दुसऱ्या दिवशी सादर झालेल्या 'शाहीर लोकरंग' या कार्यक्रमामुळे मुंबईकरांना शाहिरी परंपरा, संस्कृतीची मेजवानी अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमात मुंबईतील जुन्या आणि नवीन पिढीतील शाहीर मंचावर एकत्र आले होते. यावेळी नमन, पोवाड्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला.


भारतीय संस्कृतीची झलक

तिसऱ्या दिवशी 'संस्कृती कलात्मक भारताची' या कार्यक्रमाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमातील प्रत्येक नृत्याचा, गाण्याचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमातून भांगडा, बिहू, राजस्थानी नृत्य, भोजपुरी, बिहारी, हरियाणवी सांस्कृतीची ओळख मुंबईकरांना झाली.


गेली १८ वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेकडून करण्यात येतं. दरवर्षी असंख्य मुंबईकर या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. मुंबईकरांसाठी या कार्यक्रमाचं नि:शुल्क आयोजन करण्यात येतं. केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची सांस्कृती मुंबईकरांपर्यंत पोहोचावी हा मुख्य उद्देश आहे.

संतोष परब, आयोजक

">


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा