Advertisement

तापमानवाढीमुळे पक्षांच्या जीवनावर परिणाम

महिन्याभरात परळ येथील बाई साकरबाई दिनशॉ पेटिट (बीएसडीपी) प्राण्यांच्या रुग्णालयात निर्जलीकरणाने ग्रस्त असलेल्या 81 पक्ष्यांना दाखल करण्यात आले.

तापमानवाढीमुळे पक्षांच्या जीवनावर परिणाम
SHARES

मार्चमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा जवळजवळ 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरातील (mumbai) पक्ष्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला.

महिन्याभरात परळ येथील बाई साकरबाई दिनशॉ पेटिट (बीएसडीपी) प्राण्यांच्या रुग्णालयात निर्जलीकरणाने (dehydration) ग्रस्त असलेल्या 81 पक्ष्यांना (birds) दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी सांगितले की शहरात पाण्याचा अभाव ही समस्या निर्माण करत आहे. विशेषतः घारीसारखे मोठे पक्षी गरम हवामानात पाण्यावर अवलंबून असतात.

उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (bmc) यांनी मार्चमध्ये अनेक आरोग्य सूचना जारी केल्या होत्या.

“या काळात पक्षी आणि वन्यजीवांनाही मोठा त्रास सहन करावा लागला,” असे बीएसडीपी रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.

मार्चमध्ये निर्जलीकरणासाठी रुग्णालयात उपचार घेतलेल्या 81 पक्ष्यांमध्ये 37 घार, 22 कबुतरे, 17 कावळे, 4 पोपट आणि 1 बदक इत्यादींचा समावेश आहे.  

2024 मध्ये रुग्णालयाने 1 मार्च ते 31 मे दरम्यान 160 पक्ष्यांचे संगोपन केले होते. ज्यामध्ये 70 कबुतरे, 53 घार, 31 कावळे, 2 मैना, 2 एर्गेट आणि 2 घुबड होते.

पक्ष्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांना तोंडावाटे पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स दिले जातात आणि ते सहसा तीन ते चार दिवसांत बरे होतात.

जर त्यांची प्रकृती गंभीर असेल, तर आम्ही खारट पाणी देतो तेव्हा त्यांना बरे होण्यासाठी सुमारे सात दिवस लागतात,” डॉ. डांगर यांनी सांगितले.

बरे झाल्यानंतर घार आणि घुबडांसारखे मोठे पक्षी पुनर्वसनासाठी गैर-सरकारी संस्थांकडे सोपवले जातात तर बदके मलबार हिलमधील बाणगंगा तलावात पाठवली जातात. 

मानवी अधिवासात विलीन झालेले कबुतरे, चिमण्या, कावळे आणि इतर लहान पक्षी उघड्यावर सोडले जातात.

शहरात पाण्याचे स्रोत नसल्याने मोठ्या पक्ष्यांवर उच्च तापमानाचा परिणाम होतो, असे डॉ. डांगर म्हणाले. 

“घारींना सर्वात जास्त त्रास होतो कारण ते घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांमधून पाणी पित नाहीत. त्यांना मोठ्या पाण्याच्या स्रोतांची आवश्यकता असते,” असे ते म्हणाले.

निसर्गशास्त्रज्ञ संजय मोंगा यांनीही सहमती दर्शविली की, लहान पक्षी घराबाहेर ठेवलेल्या भांड्यांमधून पाणी पितात, तर मोठे पक्षी एकतर पाणवठ्यांवर अवलंबून असतात. तसेच ते पिंपळ, वड आणि अंजीरच्या झाडांपासून ओलावा मिळवतात मात्र ही झाडे शहरात शोधणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. हवेत धुळीचे कण आणि काँक्रीट असल्याने उच्च तापमानामुळे पक्ष्यांना समस्या निर्माण होतात, असे त्यांनी नमूद केले.



हेही वाचा

कुर्ला, पवई आणि बोरिवली येथे वृक्षारोपण होणार

मुंबई पोलिस आता ऑनलाइन सक्रिय होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा