माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन आणि अर्जुन कपूर यांच्या नावांची चर्चा होती. पण आता कपिल देव यांच्या भूमिकेसाठी दुसऱ्याच एका अभिनेत्याने बाजी मारली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून रणवीर सिंग आहे!
रणवीरने आत्तापर्यंत वेगळ्या धाटणीच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. आता क्रिकेटरच्या भूमिकेत रणवीर प्रेक्षकांची मने जिंकू शकतो की नाही, हे लवकरच कळेल.
कपिल देव यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेक अभिनेत्यांची नावे चर्चेत होती. पण ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. कबिर खान कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवत असून रणवीर सिंग या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत झळकणार आहे, अशी माहिती तरण आदर्श यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
#BreakingNews: Ranveer Singh will turn cricketer #KapilDev in Kabir Khan's sports-based film... #1983 #WorldCup.
— taran adarsh (@taran_adarsh) September 25, 2017
हा चित्रपट १९८३ सालच्या विश्वचषक स्पर्धेवर आधारित आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या सामन्यात विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीमचं कर्णधारपद कपिल देव यांच्याकडे होतं. त्यावेळी भारताने वेस्ट इंडिजला हरवले होते. कपिल देव यांचा हाच नाट्यमय जीवनप्रवास या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
हेही वाचा