अक्षय कुमार आणि किआरा आडवाणी स्टारर अपकमिंग हॉरर-कॉमेडी फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब'चे ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला. ३ मिनीट ४० सेकंदाच्या या ट्रेलरमधून तुम्हाला अक्षयच्या 'भूल भूलैया' आणि राजकुमार रावची 'स्त्री' चित्रपटाची आठवण येईल. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे.
ट्रेलर शेअर करत अक्षय कुमारने लिहीलं आहे की, 'जिते कुठे असाल, तिथे थांबा आणि तयार व्हा पाहण्यासाठी #लक्ष्मी बॉम्बचे ट्रेलर #ही दिवाळी लक्ष्मी बॉम्बची दिवाळी.' ट्रेलरमध्ये अक्षयचा पहिला डायलॉग आहे, 'जिस दिन सच में मेरे सामने भूत आया ना.. तो मां कसम सच में चूड़ियां पहन लूंगा चूड़ियां'. जस जसा चित्रपटाचा ट्रेलर पुढे जातो त्यात अक्षय कुमार साडी, बांगड्या घातलेल्या रुपात दिसतो.
चित्रपटात अक्षय आणि किआरासोबतच तुषार कपूर, शरद केळकर, अश्विनी काळसेकरसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे दिद्गर्शन राघव लॉरेंसनं केलं आहे. हा चित्रपट राघव यांच्या तमिळ 'कांचना'चा हिंदी रीमेक आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' २२ मे २०२० ला रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे रिलीज पुढे ढकलण्यात आली होती.
हेही वाचा