अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या आयुष्यावर आधारित 'पॅडमॅन' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या आवाजानं होते. 'अमेरिकेकडे 'सुपरमॅन', 'बॅटमॅन' आणि 'स्पायडरमॅन' आहेत. पण भारताकडे 'पॅडमॅन' आहे', या डायलॉगनं ट्रेलरची सुरुवात होते.
Presenting the much awaited #PadManTrailer, this one's for the mad ones, the ones who are crazy enough to change the world https://t.co/o2NiC2q1SU@PadManTheFilm @sonamakapoor @radhika_apte @mrsfunnybones @SonyPicsIndia @kriarj #RBalki
— Akshay Kumar (@akshaykumar) December 15, 2017
ट्रेलरमध्ये अक्षय कुमार महिलांना सेनिटरी पॅड वाटताना दिसत आहे. त्यामुळे महिला त्याच्यापासून लांब पळत आहेत, असं दाखवण्यात आलं आहे. अक्षयच्या याच कृतीमुळे त्याची पत्नी म्हणजेच राधिका आपटे त्याला सोडून जाते.
चित्रपटात अक्षय कुमारसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अक्षय कुमार चित्रपटात अरुणाचलम मुरुगनाथम यांची भूमिका साकारत आहे. तर राधिका अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. अरुणाचलम मुरुगनाथम यांनी ग्रामीण भागातील महिलांनी पाळीच्या दिवसांमध्ये सॅनिटरी पॅड वापरावेत, यासाठी चळवळ सुरू केली होती. यात अक्षय कुमार गावातल्या महिलांसाठी पॅड तयार करण्याचे यंत्र तयार करतो, असं दाखवलं आहे. यंत्राद्वारे गावातल्या महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचा त्याचा हेतू असतो. पण अक्षयच्या या कामाला गावकऱ्यांसोबतच त्याच्या पत्नीचा देखील विरोध असतो. पण तरीही अक्षय कुमार मागे हटत नाही आणि पॅड बनवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो.
हेही वाचा