कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जगभरात चिंतादायक वातावरण पसरलं आहे. जगभरातील देशांनी घबरदारी म्हणून लॉक डाऊनची घोषणा केली आहे. मुंबईत देखील काही कार्यालयांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जण स्वत:ला व्हायरसपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक सेलिब्रिटिजनी स्वत:ला लॉक डाऊन केलं आहे. यामध्ये बॉलिवूड (Bollywood)चे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचंही नाव आहे.
दिलीप कुमार यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. घाबरू नका, दिलीप कुमार सुखरूप आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना करोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. दिलीप कुमार यांना त्यांच्या खराब प्रकृतीमुळे याआधीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसोलेशनमध्ये ठेवल्यानं त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही.
दिलीप कुमार यांनी ट्वीट करत स्पष्ट केलं की , 'कोरोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.'
दिलीप कुमार यांच्या या पोस्टनंतर चाहते त्यांच्या सृदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसंच स्वतःला इतरांपासून वेगळं करण्याच्या त्यांचा निर्णय योग्य असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
I wish you all the health and happiness. Dilip Saab.
— Md . Imran Nazir (@Im_ImranNazir) March 16, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक हॉलिवूड स्टार्सना झाला आहे. टॉम हक्स, रीटा विल्सन, ओल्गा कुरिलेंको, लुईस सेपुलवेडा अशा काही स्टार्सचा यात समावेश आहे.
हेही वाचा