Advertisement

'हंगामा 2' चा मजेशीर ट्रेलर रिलीज, या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टीचे मोठ्या पडद्यावर कमबॅक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय.

'हंगामा 2' चा मजेशीर ट्रेलर रिलीज, या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टीचे मोठ्या पडद्यावर कमबॅक
SHARES

अभिनेत्री शिल्पा शेट्टी एका मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. हंगामा 2 हे तिच्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

२००३ मध्ये आलेल्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 'हंगामा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. तब्बल १८ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिल्पा शेट्टी, परेश रावल, मीजान जाफरी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २३ जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

'हंगामा 2'मध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबांची कथा दाखवण्यात आली आहे. एक तिवारी कुटुंब ज्यात सुंदर पत्नी आणि सर्वांचा तिरस्कार करणारा पती असतो. तर दुसरी असते कपूर फॅमिली, ज्यात एक रिटायर्ड कर्नल आणि त्यांची दोन मुले राहत असतात. पण गोंधळ तेव्हा सुरू होतो. जेव्हा एक मुलगी तिवारींच्या घरी एक बाळ घेऊन येते आणि सांगते की, हे बाळ त्यांच्या मुलाचं आहे.

परेश रावल यांनी या चित्रपटात राधे श्याम तिवारी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तर त्यांची पत्नी अंजली तिवारीच्या भूमिकेत शिल्पा शेट्टी दिसणार आहे.

या चित्रपटातून अभिनेत्री प्रणिता सुभाष बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याशिवाय या चित्रपटात राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा