भारतीय सिनेसृष्टीला लाभलेले अनमोल रत्न आणि महान गायक मोहम्मद रफी यांची आज ९३ वी जयंती... तुम मुझे यूँ भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे... हे गाणं मोहमद रफी यांनी जणू स्वत:साठीच गायलं होतं! १९७൦ साली गायलेलं हे गाणं आजही अनेकांच्या ओठांवर आहे आणि हे गाणं गाणारे मोहमद रफी सर्वांच्या आठवणीत!
मोहम्मद रफी यांनी देव आनंद, शम्मी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांसारख्या अनेक अभिनेत्यांना आवाज दिला आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या जोडीनं त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही सर्वांच्या ओठी आहेत.
रफीसाहेबांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी पंजाबच्या कोटला सुल्तान सिंह गावात झाला. मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. रफी शाळेत अत्यंत कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. पण त्यांचा कल गाण्याकडे जास्त होता. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रफींना गायनाची प्रेरणा एका फकिराकडून मिळाली होती. सात वर्षांचे असताना रफी आपल्या भावाच्या सलूनमध्ये थांबायचे. भावाच्या दुकानासमोरून नेहमी एक फकीर जायचा. त्या फकिराचं गाणं ऐकण्यासाठी ते त्या फकिराचा पाठलाग करायचे. त्या फकिराच्या गाण्याची नक्कल देखील रफी करायचे. त्यांचे मोठे भाऊ हमीद यांनी त्यांना नेहमीच प्रेरणा दिली. त्यानंतर रफी यांनी मुंबईत गाठली. सुरुवातीच्या काळातील संघर्षानंतर रफी यांना गाण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या.
रफी आणि किशोर कुमार यांच्यात नेहमीच हेल्दी कॉम्पिटिशन असायचं. आर. डी. बर्मन यांच्यामुळे रफी आणि किशोर कुमार यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं. 'प्यार का मौसम' या चित्रपटासाठी 'तुम बिन जाऊ कहाँ' हे गाणं दोन वेगळ्या प्रसंगी आणि दोन वेगळ्या पात्रांसाठी चित्रित करायचं होतं. त्यामुळे बर्मन यांनी सेम गाणं रफी आणि किशोर या दोघांकडून गाणी रेकॉर्ड करून घेतली. किशोर कुमार यांचा आवाज भारत भूषण यांच्यासाठी तर रफी यांचा आवाज शशी कपूर यांच्यासाठी देण्यात आला.
पण, किशोर कुमार आणि रफी यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एका गोष्टीवरून राजीव गांधी किशोर कुमार यांच्यावर नाराज झाले होते. त्या वेळी रफी यांनी राजीव गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. रफी यांच्या निधनाच्या दिवशी किशोर कुमार दोन तास बसून रडत होते.
भारताची फाळणी झाली तेव्हा मोहम्मद रफी यांच्या पहिल्या पत्नीनं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतला. पण आपल्या संगीतावरच्या प्रेमाखातर मोहम्मद रफी यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले आणि त्यांची पहिली पत्नी पाकिस्तानमध्ये निघून गेली.
मोहम्मद रफी यांचे संगीतावर प्रचंड प्रेम होते. ते गाण्याला कधी पैशांमध्ये तोलत नसत. एकदा लता दीदींनी त्यांना मानधन वाढवण्याची मागणी केली. यावरून रफी नाराज झाले आणि यापुढे लता दीदींसोबत गाणं न गाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
१) क्या हुआ तेरा वादा
2) ये दुनिया ये मैहफिल मेरे काम की नहीं
३) ये चाँद सा रोशन चेहरा
४) तेरी बिंदिया रे
५) गुलाबी आँखे जो तेरी देखी
हेही वाचा