आजच्या पिढीतील दिग्दर्शक नवनवीन संकल्पनांवर आधारित असलेले चित्रपट बनवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. याच धर्तीवर सोनाक्षी सिन्हानं रुपेरी पडद्यावर चक्क ‘सेक्स क्लिनीक’ सुरू केलं आहे.
‘मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है’, असा डायलाॅग असलेलं ‘खानदानी शफाखाना’ या आगामी हिंदी चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. दोन दिवसांनी या चित्रपटाचा ट्रेलरही लाँच करण्यात येणार आहे. ‘खानदानी शफाखाना’ हे शीर्षक समजायला काहीसं अवघड आणि डोक्याला काहीसा शाॅट देणारं असल्यानं त्यासोबत ‘सेक्स क्लिनीक’ असं सबटायटलही देण्यात आलं आहे. त्यावरून या चित्रपटात कशा प्रकारचं कथानक पहायला मिळेल याचा अंदाज बांधणं सोपं जातं.
या चित्रपटात सोनाक्षी सिन्हानं पुन्हा एकदा बिनधास्त पंजाबी तरुणीची भूमिका साकारली असून, तिचं नाव बेबी बेदी आहे. ‘मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शर्म आनी है’, हा संवादही तिच्याच मुखातील असल्याचं समजतं. या चित्रपटात सोनाक्षीच्या जोडीला वरुण शर्मा, अनू कपूर आणि गायक बादशहा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिल्पी दासगुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, भूषण कुमार, महावीर जैन आणि मृगदीप सिंग लांबा यांनी निर्मिती केली आहे.
हेही वाचा-
'फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल आणि क्रू मेंबर्सनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट