रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने सर्वांना आपलंसं करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा आज सोमवारी जन्मदिवस आहे. यानिमित्ताने बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट या कंपनीने एका इमारतीवर श्रीदेवी यांचं १८ फूट उंचीचं चित्र काढून आदरांजली वाहिली आहे.
वांद्रे येथील बॉलिवूड आर्ट प्रोजेक्ट या इमारतीवर रंजित दहिया यांच्याबरोबरच कुणाल दहिया, बिदीशा विश्वास, अरुशू आणि रिचा यांनी हे चित्र उत्तारलं आहे. श्रीदेवीचा गुरूदेव या चित्रपटातील लुक या चित्रात साकारला आहे. सध्या या चित्रावर शेवटचा हात मारला जात आहे. हे चित्र वेळेवर पूर्ण करण्यासाठी कलाकारांनी रात्रंदिवस काम केलं. या चित्राचा एक फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
श्रीदेवी यांचं चित्र काढल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी बॉलिवूड आर्ट प्रोजेक्टचे आभार मानले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी दुबईतल्या एका हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.