Advertisement

पॅन-आधार लिंक करण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे नवीन तारीख

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख आता पुन्हा वाढवण्यात आली आहे.

पॅन-आधार लिंक करण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे नवीन तारीख
SHARES

कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत काही घोषणा केल्या. यावेळी आयकर परतावा भरण्यास मुदतवाढ देताना आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याचीही तारीख वाढवली.  आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख आता पुन्हा वाढवण्यात आली आहे.  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची तारिख ३० जून २०२० पर्यंत वाढवली आहे. याआधी ही तारीख 31 मार्च होती.सरकारकडून नवव्यांदा ही मुदत वाढवण्यात आला आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. त्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा थांबवायचा असेल तर आधार-पॅन लिंक करणं आवश्यक आहे.

असं करा आधार-पॅन लिंकिंग

  • आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
  • तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.
  • तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
  • 'View Link Aadhaar Status'  वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
  • याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
  • UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.

हेही वाचा -

आयकर परतावा भरण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा