कोरोनामुळे केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील (gold jewelry) हॉलमार्किंग (Hallmarking) चे नियम लागू करण्यास मुदतवाढ दिली आहे. देशात आता १५ जूनपासून हॉलमार्किंगचे नियम लागू केले जाणार आहेत.
याआधी हॉलमार्किंगचे नियम १ जूनपासून लागू केले जाणार होते. मात्र, देशातील कोरोनाचा परिस्थितीमुळे हॉलमार्किंगचे नियम शिथील करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आता १५ जूनपासून देशात केवळ हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री करण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी दागिन्यांवर बीआयएस चा हॉलमार्क आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक असणार आहे.
हॉलमार्क अनिवार्य झाल्यानंतर देशभरात केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील. यामुळं ग्राहकांची फसवणूक टळेल. त्यांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळतील.
हॉलमार्किंग म्हणजे सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन असते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते. त्यामुळे कोणत्याही दागिन्यांवर बीआयएस चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्युरोच्या मानदंडावर योग्य असल्याचे समजले जाते.
हेही वाचा -
आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती
COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड