Advertisement

सुकन्या समृद्धी योजना : मुलींच्या सुरक्षित भविष्याची तरतूद

सुकन्या समृद्धी योजना काय आहे, खातं कसं उघडायचं, योजनेचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

सुकन्या समृद्धी योजना : मुलींच्या सुरक्षित भविष्याची तरतूद
SHARES

प्रत्येक आई -वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च कसा भागवायचा या चिंंतेत अनेक आई-वडील असतात. मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाच्या खर्चाचा मोठा भार एकाचवेळी पालकांवर येऊ नये या उद्देशाने केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. फक्त मुलींसाठी असलेल्या या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे. मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या लग्नाची आर्थिक तरतूद करणे हा योजनेचा उद्देश आहे. ही योजना काय आहेखातं कसं उघडायचं, योजनेचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

योजनेचे नियम 

  •  नवजात मुलगी ते १० वर्ष वयाच्या मुलीचं हे खातं उघडता येतं.       
  •  नैसर्गिक (जैविकपालक  किंवा कायदेशीर पालक यांनाच मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.      
  • २५० रुपये भरून हे खातं सुरू करता येतं.
  •  एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करता येत नाही.     
  • कमीतकमी रक्कम खात्यात जमा न केल्यास असे खाते अनियमित म्हणून जाहीर होते.  ५० रुपये दंड भरून हे खाते पुन्हा सुरु करता येते.
  •  या  खात्यात तुम्ही रोख किंवा डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या रुपात जमा करू शकता.         
  • मुलींना २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्यातील रकमेवर कोणतेही व्याज मिळत नाही.
  • दहा वर्ष पूर्ण झाल्यास मुलगी स्वतःच खाते चालवू शकते. तरीही खात्यात पालक प्रतिमहिना ठेवी जमा करू शकतात.
  • जमा होणारी रक्कम आणि व्याज अशा एकूण मोबदल्यावर आयकर भरावा लागत नाही
  • कलम  ८० सी अंतर्गत सुकन्या समृद्धी खात्यावर प्रतिवर्ष दीड लाख रुपयांची कर सवलत मिळते.

मॅच्युरिटीचे नियम 

  • खाते मुलीच्या विवाहाच्या तारखेपासून बंद होते
  • जीवघेणा आजार किंवा इतर कोणत्याही कारणाने हे खाते पाच वर्ष  पूर्ण झाल्यानंतर बंद करता येते
  •  खातेधारक मुलीचा अकाली मृत्यू झाल तर खाते ताबडतोब बंद केले जातेखातेधारकाच्या पालकांना खात्यात जमा असलेली रक्कम व्याजासह मिळते.

 खाते उघडण्यासाठी कागदपत्रे

  •  मुलीचे  जन्म प्रमाणपत्र
  •  पालकांचे  ओळखपत्र आणि निवासी पुरावा
  •  एकाच वेळी जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्माच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
  •  पालकांचे पॅन कार्ड

खाते कुठं उघडता येतं

  • जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये.
  • सर्व सरकारी बँकामध्ये.
  • ज्या बँकामध्ये पीपीफ खाते उघडण्याची सुविधा आहे तिथे खाते उघडता येते.

हेही वाचा  -

पीपीएफ : सरकारी हमीचा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

मोफत नाही मिळत क्रेडिट कार्डची सेवा, बँका आकारतात 'हे' शुल्क




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा