Advertisement

पत्रकारांना पेन्शन मिळणार, पत्रकार सन्‍मान योजना लवकरच सुरू


पत्रकारांना पेन्शन मिळणार, पत्रकार सन्‍मान योजना लवकरच सुरू
SHARES

राज्यातील पत्रकारांना आता पेन्शन मिळणार आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्‍यातील पत्रकारांच्या पेन्शन योजनेच्या मागणीला यश आलं आहे. लवकरच स्‍व. बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजना सुरू करण्यात येणार अाहे. या योजनेसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात अाली अाहे.  त्यामुळे पत्रकारांना या योजनेतून पेन्शन मिळेल.

फाइल परत पाठवली 

पत्रकार खाजगी कर्मचारी असल्याने तसंच पेन्शन योजना शासनाने २००५ मध्‍ये बंद केल्याने पेन्शन  देता येणार नाही, असं सांगून या योजनेची फाईल वित्‍त विभागाने काही महिन्‍यांपूर्वी प्रशासन विभागाकडे परत पाठविली होती. त्यामुळे पेन्शन योजना लागू होणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.


अर्थमंत्री-पत्रकार बैठकीचं फलीत

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात २९ जूनला वित्‍त व नियोजन विभागाची बैठक घेतली. यावेळी  माहिती जनसंपर्क विभागाचे अधिकारी, राज्‍य पत्रकार अधिस्‍वीकृती समिती व वित्‍त विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार सन्‍मान योजनेसाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्‍यांमध्‍ये १५ कोटी रूपयांची तरतूद करावी असे आदेश दिले.  

माहिती व जनसंपर्क विभागाने तात्‍काळ दुसऱ्याच दिवशी वित्‍त विभागास प्रस्‍ताव पाठविला.   मंगळवारी ४ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या दोन्‍ही सभागृहात सादर करण्‍यात आलेल्‍या पुरवणी मागण्‍यांमध्‍ये पत्रकार सन्‍मान योजनेसाठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली. या निधीतून सन्‍मान योजना लवकरच सुरू होणार आहे.



हेही वाचा -

नो टेन्शन : अाता पॅन - आधार लिंक करा मार्च २०१९ पर्यंत

जीएसटीला एक वर्ष पूर्ण : जीएसटी योग्य की अयोग्य?



 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा