देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे. कंपनीच्या वाहनां च्या विक्रीत मार्च २०२० मध्ये ४७ टक्के घट झाली आहे. मार्चमध्ये मारुतीच्या ८३७९२ वाहनांची विक्री झाली आहे. कंपनीने मागील वर्षी मार्चमध्ये १,५८०७६ वाहने विकली होती, असं मारुतीने एका निवेदनात म्हटलं आहे.
मारुतीसह एमजी मोटर्सला फटका बसला आहे. एमजी मोटर्सच्या १५१८ वाहनांची विक्री मार्चमध्ये झाली आहे. एमजी मोटर इंडियाने सांगितलं की, मार्च २०२० मध्ये १५१८ वाहनांची विक्री झाली. यामध्ये ११६ झेडएस ईव्ही आणि १४०२ हेक्टर एसयूव्हीचा समावेश आहे.
मारूतीच्या अल्टो आणि वॅगन आर आदी छोट्या कार मार्चमध्ये १५९९८ इतक्या विकल्या गेल्या आहेत. मागील वर्षी याच महिन्यात १६८२६ कार विकल्या होत्या. छोट्या कारची विक्री पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बलेनो आणि डिझायरसारख्या कॉम्पक्ट श्रेणीची विक्री ५०.९ टक्क्यांनी घटून ४०५१९ वाहनांची विक्री झाली आहे.तर व्हिटार ब्रेझा, एस-क्रॉस आणि एर्टिगासह यूटिलिटी वाहनांची विक्री ५३.४ टक्क्यांनी घटून ११९०४ इतकी झाली. मार्चमध्ये निर्यातही ५५ टक्क्यांनी घटली आहे.
हेही वाचा -
मुंबईतील पंचांच्या आर्थिक मदतीसाठी माजी पंचांचा मदतीचा हात
मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद