Advertisement

अंधेरी : गोखले पूल मे 2025 मध्ये खुला होण्याची शक्यता

यावेळी तरी पालिका हा ब्रिज सुरू करण्याची तारीख पुढे ढकलणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

अंधेरी : गोखले पूल मे 2025 मध्ये खुला होण्याची शक्यता
SHARES

गोखले पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. 15 मे पर्यंत हा रस्ता सर्व सामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपुलाचा पश्चिमेकडील बाजू यांच्यातील कनेक्टर बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. 

लोखंडवाला येथील रहिवासी करण जोटवानी, जो या मार्गावरून वारंवार प्रवास करतो, त्याने मिड डे ला सांगितले की, “बर्फीवाला उड्डाणपुलाला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पूर्व-पश्चिम भाग उघडल्यानंतर, वाहनचालक वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) वरून JVPD स्कीम सिग्नलच्या दिशेने वेगाने प्रवास करू शकतील. त्यामुळे सुमारे 115 मिनिटांचा वेळ वाचेल. आशा आहे की यावेळी पूल खुला होण्यास आणखी विलंब होणार नाही.”

दरम्यान, या जागेचा वापर स्थानिकांनी दुचाकीसह वाहने उभी करण्यासाठी केला आहे. एका स्थानिक रहिवाशाने नाव न छापण्याची विनंती करत मिड-डेला सांगितले की, लोकांना आता उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील बाजूस पार्क न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण तो पुढील महिन्यात उघडण्याची अपेक्षा आहे.

आणखी एक प्रवासी, मनीष संघवी म्हणाले, "आम्ही सर्वजण गोखले पुलाचा दुसरा टप्पा उघडण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. हा पूर्व-पश्चिम कनेक्टर वाहतुकीचा त्रास कमी करेल, विशेषत: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेकडील प्रवास करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आम्हाला आशा आहे की BMC त्याच्या मे 2025 च्या अंतिम मुदतीवर कायम राहील."

7 नोव्हेंबर 2022 रोजी हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सुरुवातीला ते मे 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु गेल्या दोन वर्षांत अनेक विलंबांना सामोरे जावे लागले. BMC ने 26 फेब्रुवारी 2024 रोजी उंचीच्या निर्बंधांसह पुलाच्या दोन लेन उघडल्या.

सध्या, कार आणि दुचाकींसह फक्त हलक्या वाहनांना परवानगी आहे. अजूनही बसेसना परवानगी नाही. 2018 मध्ये सुरू झालेला गोखले पूल प्रकल्प सुरुवातीला BMC (अप्रोच रस्त्यांसाठी) आणि पश्चिम रेल्वे (रूळावरील पुलासाठी) मध्ये विभागला गेला होता. मात्र, नंतर हा संपूर्ण प्रकल्प बीएमसीकडे सोपवण्यात आला. आता ते मे 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "बर्फीवाला उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील बाजूस जोडणाऱ्या गोखले पुलाच्या पश्चिमेकडील बाजूचे काम प्रगतीपथावर आहे. ते पूर्णत्वाच्या जवळ आले आहे, आणि हा पूल मे महिन्यात खुला होण्याची अपेक्षा आहे."



हेही वाचा

धारावी पुनर्विकासाबाबत रहिवाशांचे नाराजीचे सूर

लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच मिळणार?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा