Advertisement

MNP प्रक्रिया ५ दिवस बंद, 'हे' आहे कारण

एमएनपीचा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार आता मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करण्यासाठी अवघे २ दिवस लागणार आहेत.

MNP प्रक्रिया ५ दिवस बंद, 'हे' आहे कारण
SHARES

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) प्रक्रिया १० डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान  बंद राहणार आहे. केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय)  दिलेल्या निर्देशानुसार ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमएनपीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांचे मोबाइल क्रमांक पोर्ट करण्यात येणार आहेत. त्यानंतर नवीन एमएनपी प्रक्रिया राबवण्यासाठी ५ दिवस एमएनपीची सेवा बंद राहणार आहे. 

एमएनपीचा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार आता मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करण्यासाठी अवघे २ दिवस लागणार आहेत. या आधी पोर्टेबिलिटी करण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी लागत होता. ग्राहकाला दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर मात्र चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. १३ डिसेंबर २०१८ रोजी ट्रायने एक प्रसिध्दीपत्रक काढलं होत. यानुसार  ११ नोव्हेंबर २०१९ पासून पोर्टेबिलिटीच्या नवीन नियमांची अंमलबजावणी होणार होती.  मात्र काही चाचण्यांसाठी विलंब झाल्याने आता या नियमाची अंमलबजावणी १६ डिसेंबरपासून होणार आहे.

२५ नोव्हेंबर २०१० मध्ये एमएनपी सेवेला प्रारंभ झाला होता. तर देशभरात ही सेवा २० जानेवारी २०११ पासून सुरु करण्यात आली होती. कर्नाटकात सर्वात जास्त म्हणजे ४ कोटी २० लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.



हेही वाचा  -

आयटी रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

'ह्या' मार्गाने पीपीएफमध्ये करा ऑनलाइन पैसे जमा




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा