अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं तब्बल ७ हजार कोटी रुपयांचं कंत्राट मिळवलं आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून हे कंत्राट रिलायन्स इन्फास्ट्रक्चरला देण्यात आलं आहे. वर्सोवा-वांद्रे सी लिंकची लांबी १७.१७ किलोमीटर इतकी असून ही लांबी वांद्रे-वरळी सी लिंकच्या लांबीपेक्षी तिप्पट आहे. वांद्रे-वरळी सी लिंकची लांबी ५.६ किलोमीटर आहे.
रिलायन्स इन्फ्राला कंत्राट मिळाल्याच्या म्हणजे २४ जून २०१९ पासून ६० महिन्यांच्या आत या प्रकल्पाचं काम पूर्ण करायचं आहे. मुंबईकरांच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबईकरांच्या प्रवास कालावधीत दीड तासांवरून १० मिनिटांवर येणार असल्याची माहिती समोर येतं आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत ३ हजार ३०१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा कंपनीनं नोंदवलेला सर्वाधिक तोटा आहे. या तोट्यामुळं कंपनीच्या शेअरमध्येही घसरण झाली होती. मात्र, दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरच्या किंमतीत १७.७१ टक्क्यांनी वाढ झाली असून, दिवसअखेर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ६१.१५ रुपये प्रति शेअर असा होता.
हेही वाचा -
मध्य रेल्वेच्या मुंबई-शिर्डी मार्गावर 'ट्रेन १८' धावणार?
पाणी जपून वापरा; तलावांमध्ये २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा