रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक नवीन प्लान लॉन्च केला आहे. नवा प्लान ४९९ रुपयांचा आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना ९१ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. हा प्लान ९१ दिवस चालेल. यापूर्वी रिलायन्स जियोने ४५९ रुपयांचा प्लान आणला होता. ज्यात ८४ जीबीसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.
जियोने या नवीन प्लानची माहिती अजून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर टाकलेली नाही. त्याचसोबत अधिकृत घोषणाही केेलेली नाही. पण हा ४९९ रुपयांचा प्लान 'माय जियो अॅप'वर तुम्ही बघू शकता. या अॅपमध्ये दिलेल्या माहितीनुसार जियो युजर्सना ९१ दिवसापर्यंत १ जीबी डेटा मिळेल.
या व्यतिरिक्त कंपनीने ३०९ रुपयांचा प्लानही अपडेट केला आहे. ३०९ रुपयांच्या रिचार्जवर ४९ दिवसांपर्यंत ४९ जीबीचा डेटा मिळेल. यापूर्वी ५६ दिवसांसाठी ५६ जीबी डेटा मिळत होता. पण दिवाळीत हा प्लान अपडेट झालेल्या जुना ३०९ रुपयांचा प्लान काढून टाकण्यात आला.
आता ३९९ रुपयांचा हा प्लान ८४ दिवसांच्या जागी ७० दिवसापर्यंत करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने १९ रुपये, ४९ रुपये आणि ९६ रुपयांचा प्लान पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला हा प्लान मिळणार नाही.
हेही वाचा-
जियो दिवाली धना धन...जियोचा दिवाळी बंपर धमाका