Advertisement

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना

पोस्ट आॅफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार दीड लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. कर सवलत मिळणाऱ्या पोस्टाच्या या कोणत्या योजना आहेत? ते जाणून घेऊयात.

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना
SHARES

पोस्ट आॅफिस आपल्या पोस्टल सेवेसह अनेक प्रकारच्या बचत योजनाही राबवते. या योजना विविध व्याजदराच्या असून चांगला परतावा देणाऱ्या आहेत. पोस्ट आॅफिसच्या ९ प्रकारच्या बचत योजना सुरू आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. पोस्ट आॅफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम ८० सी नुसार दीड लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. कर सवलत मिळणाऱ्या पोस्टाच्या या कोणत्या योजना आहेत? ते जाणून घेऊयात.

मुदत ठेवी 

पोस्टाच्या १, , ३ आणि ५ वर्ष मुदतीच्या ठेव योजना आहेत. , , आणि ३ वर्षांच्या मुदत ठेवी योजनांवर पोस्ट वर्षाला ७ टक्क्याने व्याज देते. तर ५ वर्ष मुदतीच्या योजनेवर ७.८ टक्के व्याज ठेवीदारांना मिळतं. ५ वर्ष मुदतीच्या योजनेवर ८० सी नुसार कर सवलतीसाठी दावा करता येतो.


वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

या योजनेत ६० वर्ष आणि त्या पुढील वयाच्या वरिष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत वर्षाला ८.७ टक्के व्याज मिळतं. जर व्याजाची रक्कम १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर यावर टीडीएस कापला जातो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ८० सी नुसार कर सवलत मिळते.

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड (PPF)

पीपीएफ खातं अवघ्या १०० रुपयाने पोस्टात उघडता येतं. या खात्यावर एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये जमा करणं आवश्यक आहे. तर वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये या खात्यात टाकता येतात. पीपीएफमधील गुंतवणुकीवर ८० सी नुसार कर सवलतीसाठी दावा करता येतो. या योजनेत वार्षिक ८ टक्के व्याज मिळते आणि तेही चक्रवाढ पद्धतीने.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)

या योजनेत ८ टक्के दराने वर्षाला व्याज मिळतं. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर ८० सी नुसार कर सवलत मिळते. या योजनेत दर वर्षी व्याज जमा होतं. मात्र, मुदत संपल्यावरच व्याज मिळतं. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात ५ वर्षांसाठी १०० रुपये गुंतवणूक केल्यास १४६.९३ रुपये मिळतील.



हेही वाचा  -

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

का भरायचा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या कारण आणि फायदे



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा