बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) कांदिवली पूर्व मधील आकुर्ली येथे उभारलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात सोमवारी विद्यार्थ्यांच्या रोजगार मेळाव्याचे (job fair) आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 1 हजार 490 उमेदवार नोकरीच्या शोधात आले होते.
त्यापैकी पात्र ठरलेल्या 540 उमेदवारांना नोकरी मिळाली. तसेच, त्यांना जागीच ऑफर लेटर देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात 28 व्यावसायिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, उपस्थित होतकरू विद्यार्थ्यांना कांदिवली पूर्व येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली.
महानगरपालिकेच्या (bmc) नियोजन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या कांदिवली (kandivali) येथील कौशल्य विकास केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतर उपलब्ध असलेले व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीची संधी याबाबत जनजागृती करण्यात येते.
तसेच या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांनी युवक वर्गासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत सोमवारी रोजगार (job) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 1 हजार 490 उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी 540 उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली.
टीम लीस, योमन, जीनीअस, पॉवर पाईंट, ॲक्सिस, पॉलिसी बॉस्, आय करिअर, अदानी आदी 28 व्यावसायिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच, पात्र उमेदवारांना तात्काळ ऑफर लेटर (offer letter) देण्यात आले.
या कौशल्य विकास केंद्रात हॉटेल मॅनेजमेंट, विक्री आणि व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, एसी, फ्रीज दुरुस्ती प्रशिक्षण, व्हीएफक्स-ॲनिमेशन प्रशिक्षण, शिवणकामाचे व्यावसायिक प्रशिक्षण, पंचतारांकित हॉटेल्समधील नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आदी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
या केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत इयत्ता नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी तसेच विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे.
महापालिकेतर्फे माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी शनिवारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या इयत्ता नववी आणि दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना, तसेच पालिकेच्या शाळेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी या केंद्राबाबत माहिती द्यावी असा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.
हेही वाचा