01/17

कांदिवलीतल्या चारकोप इथं असलेल्या श्री साई सच्चिदानंद मंदिरात रविवारी सकाळी ३.३० च्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की मंदिराच्या आत झोपलेल्या पुजार्यांईना बाहेर येण्याची संधीही मिळू शकली नाही. या घटनेत दोन पुजारींना घटानास्थळीच आपला जीव गमवावा लागला. तर आणखी एका पुजारीची प्रकृती चिंताजनक आहे.
02/17

२५ डिसेंबर २०२० मध्ये गोरेगाव इथल्या दिंडोशी पूर्वेकडील वाघेश्वरी मातेच्या मंदिराजवळील लग्नाचं मंडप आगीत जळून खाक झालं होतं. दिंडोशी पूर्वेकडील वाघेश्वरी मातेच्या मंदिराजवळ लग्नाचं मंडप बांधण्यात आलं होतं. या आगीत संपूर्ण मंडप जळून खाक झाला.
03/17

१७ नोव्हेंबर २०२० मध्ये कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरातील टेकडीवर एकोरिना-कॅसोरीना नावाची मोठी सोसायटी आहे. यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रशस्त घराला आग लागली होती. बेडरूममध्ये असणाऱ्या एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत ती आग संपूर्ण घरात पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. सोसायटीत अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याची माहितीही समोर येत आहे.
04/17

मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या सिटी सेंटर मॉलला २३ ऑक्टोबरला आग लागली होती. जवळपास ५६न तासांनी म्हणजेच २७ ऑक्टोबरला ही आग विजवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या मॉलमध्ये मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर दुकानं आहेत. त्यामुळे मॉलमधील तिसरा मजलाही जळून खाक झाला. यात ६ अग्निशमन दल देखील जखमी झाले.
05/17

मुंबईच्या मुलुंड परिसरातील अॅपेक्स रुग्णालयाला १३ ऑक्टोबर अचानक आग लागली होती. अॅपेक्समध्ये मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. एकीकडे वीज नाही त्यात जनरेटर जळल्याने इथल्या तीस ते चाळीस रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले. या आगीत एकाचा मृत्यू देखील झाला होता.
06/17

मुंबईच्या फोर्ट परिसरातील बाहुबली इमारतीला २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमाराला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि पाण्याचे ५ टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीत २२ वर्षांचा तरुण ३० ते ३५ टक्के जखमी झाला होता.
07/17

मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केट परिसरात ११ जून २०२० मध्ये भीषण आग लागली होती. क्रॉफर्ट मार्केटमधल्या ४ दुकानांमध्ये ही आग लागली होती. उंदरानं वायर कुरतडल्यानंतर शाॅर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असा अंदाज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला होता.
08/17

दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील अॅटलास या ६ मजली इमारतीला ५ मे २०२० मध्ये आग लागली होती. फ्लॅट क्रमांक ६१मधील इलेक्ट्रिक्स वायर आणि फर्निचरनं भराभर पेट घेतल्यानं दुसऱ्या मजल्यावर आगीचं तांडव झालं. आग प्रचंड भयानक असल्यानं आगीमुळं इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील अनेक फ्लॅट जळून खाक झाले.
09/17

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यासमोरील सी स्प्रिंग नावाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर १९ मार्च २०२० मध्ये आग लागली होती. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली होती.
10/17

डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीला १८ फेब्रुवारी २०२० मध्ये भीषण आग लागली होती. आगीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. एवढंच नाही तर स्फोटाच्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला होता.
11/17

मुंबईतील माझगाव परिसरातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनमध्ये १७ फेब्रुवारी २०२० मध्ये भीषण आग लागली होती. इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर आग लागली होती. आग लागल्याचं समजताच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक अर्धवट सोडून घटनास्थळी आले होते.
12/17

१३ फेब्रुवारी २०२० मध्ये अंधेरी पूर्वेतील रोल्टा कंपनीमध्ये आग लागली होती. आग मोठी असल्यानं परिसरात धुराचे लोट दिसत होते.
13/17

मुंबईच्या कांदिवली परिसरात मंगळवारी संभाजी नगर इथल्या जानुपाडा गवारेचाळीत १२ फेब्रुवारीला सिलेंडर गॅसचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत ९ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार केले गेले. या आगीत गवारे चाळीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते.
14/17

मुंबईच्या मलबार हिल (Malabar Hill) परिसरातल्या हँगींग गार्डन शेजारील इमारतीला ५ फेब्रुवारीला आग (Fire) लागली होती. इमारत १४ मजल्याची असून पाचव्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली होती. या आगीत इमारतीमधील रहिवाशी अजय जाधव (४०) आणि अग्नीशमन दलाचे फायरमन राहुल कावटे (२८) हे दोन जण जखमी झाले होते.
15/17

कुर्ला पश्चिम इथल्या आंबेडकर नगर जवळील मेहताब को-ऑप सोसायटीला २५ जानेवारीला भीषण आग लागली होती. दोन मजली असलेली ही इमारत आगीत जळून खाक झाली होती. इमारतीमधल्या एका घरातील सिलेंडरमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली होती.
16/17

शिळफाटाजवळील खान कंपाऊंड इथल्या ७ गोदामांना ७ जानेवारीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या भिषण आगीत ७ गोदामांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.
17/17

नागपाडा इथल्या चायना बिल्डिंगला ६ जानेवारीला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत पाच जण जखमी झाले होते.
संबंधित विषय