दादर (Dadar) रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अतिक्रमण पालिकेने हटवले आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिकेने ही मोहीम हाती घेतली होती. सुमारे 220 बेकायदेशीर फेरीवाले (hawkers) हटवून पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ते मोकळे केले. महापालिक आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी अचानक भेट देऊन फेरीवाल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची पाहणी केली.
दादर हे शहरातील खरेदीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आणि पसंतीचे ठिकाण आहे. पश्चिम (western railway) आणि मध्य रेल्वेला (Central railway) जोडणारे आणि भाजीपाला तसेच फूल मार्केटने वेढलेले हे स्टेशन दररोज लाखो लोक येथे ये-जा करतात. मात्र, बहुतांश रस्ते आणि फूटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने फेरिवाल्यांविरोधात मोहीम सुरू केली.
28 ते 30 जून या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. पालिका प्रशासनाने संपूर्ण शहर आणि उपनगरात अशीच मोहीम राबवून 530 हून अधिक अनधिकृत फेरीवाले हटवले. महापालिकेने कुर्ला(kurla), अंधेरी (Andheri) आणि बोरिवली (Borivali) सारख्या इतर भागांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उच्च न्यायालयापर्यंतचा फूटपाथही मोकळा केला आहे. तसेच उघड्यावरील दूषित अन्नामुळे होणाऱ्या हंगामी रोगांचा प्रसार रोखण्यासाठी कारवाई सुरू झाली.
शहरातील विविध भागात सायंकाळच्या वेळेत चालणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई सुरू झाली आहे. नागरी अधिकाऱ्यांनी शहर आणि उपनगरांसाठी प्रत्येकी एक अशी तीन टीमची नियुक्ती केली आहे. आम्ही रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर रित्या उभी केलेली वाहनेही उचलत आहोत. मुंबई पोलिसांच्या (mumbai police) मदतीने सकाळी 8 ते 11 या वेळेत दिवसातून दोनदा कारवाई केली जाते, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा